मावळ तालुक्याची राजधानी संबोधल्या जाणाऱ्या वडगाव शहराचा विस्तार मोठ्या झपाट्याने वाढत चालला असून तितक्याच वेगाने येथील नागरीकरण ही वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाचा विचार लक्षात घेता प्रत्येक रहिवासी नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करणे हे वडगाव नगरपंचायतीचे परम कर्तव्य असून देखील नगरपंचायत कडून नागरिकांना दूषित पाणी पुरवठा करण्याचे काम होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
या सर्व प्रकरणाची वास्तवता समोर आणणारी चित्रफित मनसे कडून नुकतीच प्रसारित करण्यात आली असून शहराला तीन-तीन पाणी योजना कार्यरत असताना मोडकळीस व जीर्ण अवस्थेत तसेच साठवण क्षमता कमी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रामुळे वडगावकरांना वर्षानुवर्ष दूषित पाणी पिण्याची हि वेळ पाणीपट्टी व नळ जोडणीच्या नावाखाली भरमसाठ कर आकारणी करणाऱ्या नगरपंचायत व विकासाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांमुळे आली आहे. ( Supply of polluted water to citizens of Vadgaon Maval City Allegation of MNS Rupesh Mhalskar )
सर्वसामान्य करदात्यांना पिण्यायोग्य पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असताना मात्र वडगाव शहरातील रहिवाशी याला अपवाद ठरले आहेत. या उलट दूषित पाणीपुरवठा करून त्यांच्या जीवाशी व आरोग्याशी खेळण्याचं काम वडगाव नगरपंचायत हे कित्येक वर्षापासून करत असल्याचे आरोप मनसेच्या वतीने यावेळी करण्यात आला. तसेच सद्या नद्यांची मूळस्थिती सांडपाणी,जलपर्णी व गटारीमुळे पूर्णतः दूषित आणि दयनीय झाल्याचे निदर्शनास येत असताना वडगाव हद्दीतील अनेक गृहप्रकल्प हे त्यांचे सांडपाणी मैला शुद्धीकरण प्रक्रिया न करता ओढ्या-नाल्यात उघड्यावर सोडत असून यावर नगरपंचायत प्रशासनाची कोणतेही नियंत्रण नसल्याने ते पाणी इंद्रायणी नदीच्या पात्रात जाऊन मिळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंद्रायणी नदी प्रदूषित झाली आहे.
यामुळे ऐन पावसाळ्यात वडगावकर नागरिकांना आपले आरोग्य धोक्यात टाकून दूषित पाणी पिण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे नुसते पाणी योजनेचे कागदी घोडे कागदावर न नाचवता वडगावकरांच्या आरोग्य व भवितव्याचा विचार करून संपूर्ण शहराला शुद्ध पाणीपुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्र लवकरात लवकर उभारावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांसाठी सरकारचे प्रमुख 5 निर्णय, एका क्लिकवर वाचा सर्व निर्णय । Pavana Dam Affected Farmers News
– ब्रेकिंग ! पवना धरणग्रस्तांना 50 वर्षांनंतर मिळाला न्याय, आमदार सुनिल शेळके आणि धरणग्रस्तांच्या सातत्यपुर्ण प्रयत्नांना यश
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला नेमकं काय आलं ? वाचा सविस्तर