व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दूषित पाणी पुरवठ्यामुळे वडगावकर नागरिकांचे आरोग्य धोक्यात ? मनसे तालुकाध्यक्षांचे स्टींग ऑपरेशन !

मावळ तालुक्याची राजधानी संबोधल्या जाणाऱ्या वडगाव शहराचा विस्तार मोठ्या झपाट्याने वाढत चालला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 13, 2024
in लोकल, शहर
Vadgaon Maval City

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्याची राजधानी संबोधल्या जाणाऱ्या वडगाव शहराचा विस्तार मोठ्या झपाट्याने वाढत चालला असून तितक्याच वेगाने येथील नागरीकरण ही वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाचा विचार लक्षात घेता प्रत्येक रहिवासी नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करणे हे वडगाव नगरपंचायतीचे परम कर्तव्य असून देखील नगरपंचायत कडून नागरिकांना दूषित पाणी पुरवठा करण्याचे काम होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

या सर्व प्रकरणाची वास्तवता समोर आणणारी चित्रफित मनसे कडून नुकतीच प्रसारित करण्यात आली असून शहराला तीन-तीन पाणी योजना कार्यरत असताना मोडकळीस व जीर्ण अवस्थेत तसेच साठवण क्षमता कमी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रामुळे वडगावकरांना वर्षानुवर्ष दूषित पाणी पिण्याची हि वेळ पाणीपट्टी व नळ जोडणीच्या नावाखाली भरमसाठ कर आकारणी करणाऱ्या नगरपंचायत व विकासाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांमुळे आली आहे. ( Supply of polluted water to citizens of Vadgaon Maval City Allegation of MNS Rupesh Mhalskar )

सर्वसामान्य करदात्यांना पिण्यायोग्य पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असताना मात्र वडगाव शहरातील रहिवाशी याला अपवाद ठरले आहेत. या उलट दूषित पाणीपुरवठा करून त्यांच्या जीवाशी व आरोग्याशी खेळण्याचं काम वडगाव नगरपंचायत हे कित्येक वर्षापासून करत असल्याचे आरोप मनसेच्या वतीने यावेळी करण्यात आला. तसेच सद्या नद्यांची मूळस्थिती सांडपाणी,जलपर्णी व गटारीमुळे पूर्णतः दूषित आणि दयनीय झाल्याचे निदर्शनास येत असताना वडगाव हद्दीतील अनेक गृहप्रकल्प हे त्यांचे सांडपाणी मैला शुद्धीकरण प्रक्रिया न करता ओढ्या-नाल्यात उघड्यावर सोडत असून यावर नगरपंचायत प्रशासनाची कोणतेही नियंत्रण नसल्याने ते पाणी इंद्रायणी नदीच्या पात्रात जाऊन मिळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंद्रायणी नदी प्रदूषित झाली आहे.

यामुळे ऐन पावसाळ्यात वडगावकर नागरिकांना आपले आरोग्य धोक्यात टाकून दूषित पाणी पिण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे नुसते पाणी योजनेचे कागदी घोडे कागदावर न नाचवता वडगावकरांच्या आरोग्य व भवितव्याचा विचार करून संपूर्ण शहराला शुद्ध पाणीपुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्र लवकरात लवकर उभारावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांसाठी सरकारचे प्रमुख 5 निर्णय, एका क्लिकवर वाचा सर्व निर्णय । Pavana Dam Affected Farmers News
– ब्रेकिंग ! पवना धरणग्रस्तांना 50 वर्षांनंतर मिळाला न्याय, आमदार सुनिल शेळके आणि धरणग्रस्तांच्या सातत्यपुर्ण प्रयत्नांना यश
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला नेमकं काय आलं ? वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये झाला मुलीचा जन्म, मुस्लीम कुटुंबीयांनी मुलीचे नाव ठेवले ‘महालक्ष्मी’, लोणावळा स्थानकावरील घटना

Next Post

संस्कृती फाऊंडेशन आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्याला मदतीचा हात !

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Financial assistance to student

संस्कृती फाऊंडेशन आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्याला मदतीचा हात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.