व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना धरणग्रस्तांना 50 वर्षांनंतर मिळाला न्याय, आमदार सुनिल शेळके आणि धरणग्रस्तांच्या सातत्यपुर्ण प्रयत्नांना यश

पवना धरणग्रस्त 764 खातेदारांना मिळणार प्रत्येकी चार एकर जमीन - पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 16, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल
farmers affected by Pavana dam

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव दाभाडे, 12 जून – आपल्या न्याय्य हक्कांसाठी 50 वर्षांहून अधिक काळ लढा देत असलेल्या पवना धरणग्रस्तांना अखेर न्याय मिळाला आहे. पवना धरणग्रस्त 764 खातेदारांना प्रत्येकी चार एकर जमीन परत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवारी) मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मावळचे आमदार सुनील शेळके गेली साडेचार वर्षे अथक प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावत न्याय मिळवून दिल्याबद्दल धरणग्रस्त शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.  (  मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आमदार शेळके यांच्या पुढाकाराने मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात अधिकारी व धरणग्रस्त शेतकरी यांची  संयुक्त बैठक झाली. त्यावेळी पवना धरणग्रस्त संयुक्त समितीचे अध्यक्ष नारायण बोडके, संजय खैरे, बाळासाहेब मोहोळ, लक्ष्मण काळे, मुकुंदराज काऊर, संतोष कडू, दत्तात्रय ठाकर, रामभाऊ कालेकर तसेच सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ( 764 farmers affected by Pavana dam will get four acres of land each said rehabilitation minister anil patil )

  • पवना धरणग्रस्त प्रत्येक खातेदाराला चार एकर क्षेत्र वाटप करण्याच्या निर्णयावर पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या बैठकीत शिक्कामोर्तब केले. खातेदारांना दोन एकर क्षेत्र धरण परिसरात देण्यात येणार असून उर्वरित दोन एकर क्षेत्र पुणे जिल्ह्यात इतर ठिकाणी देण्यात येणार आहे. एकूण 764 खातेदारांना सुमारे 1,839 एकर क्षेत्रापैकी 1,528 क्षेत्र पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात येणार आहे तसेच सुमारे 311 एकर क्षेत्रामध्ये रस्ते,ओढे, नाले, वने व धरण सुरक्षेकरिता क्षेत्र ठेवले जाणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. 

ज्या शेतकऱ्यांकडे पुरावे आहेत, परंतु ते खातेदार नाहीत,अशा शेतकऱ्यांना देखील या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. त्या शेतकऱ्यांनी सर्व माहिती व कागदपत्रांसह पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांच्याकडून संपूर्ण प्रस्ताव आठ दिवसांमध्ये पुनर्वसन विभागाकडे मंत्रालय स्तरावर पुढील आठ दिवसात सादर करावा, असे निर्देश मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहेत. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पुढील आठ दिवसांत त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘प्रत्येक खातेदाराला चार एकर जमीन देण्याचा निर्णय मंत्री महोदयांनी दिला असून दोन एकर क्षेत्र मावळ तालुक्यात व दोन एकर क्षेत्र दुसऱ्या तालुक्यात देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळाल्याचे समाधान आहे. मावळच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या व धरणग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या वतीने आपण महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार मानतो, अशी प्रतिक्रिया आमदार शेळके यांनी बैठकीनंतर व्यक्त केली. 

“सुमारे पन्नास वर्षांपूर्वी पवना धरणासाठी मावळातील स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. 1965 मध्ये ही प्रक्रिया सुरू झाली आणि 1972 मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले. या प्रकल्पातील काही बाधित खातेदारांचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु उर्वरित खातेदार मागील अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होते. हा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मागील साडेचार वर्षांपासून मी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. अधिवेशनात देखील हा प्रश्न मांडला, मंत्रालय स्तरावर तसेच विभागनिहाय संयुक्त बैठका घेतल्या,आंदोलनात सहभागी झालो. अखेर आज झालेल्या बैठकीत पुनर्वसन मंत्र्यांनी निर्णयावर शिक्कामोर्तब केले आणि शेतकऱ्यांसोबत घेतलेल्या प्रयत्नांना अखेर सकारात्मक यश मिळाले आहे,” असे आमदार शेळके म्हणाले.

आजच्या बैठकीत झालेले सकारात्मक निर्णय
1. पवना धरणग्रस्त प्रत्येक खातेदाराला चार एकर क्षेत्र वाटप करण्यात येणार.
2. दोन एकर क्षेत्र धरण परिसरात देण्यात येणार.
3. दोन एकर क्षेत्र जिल्ह्याच्या इतर ठिकाणी.
4. एकूण 764 खातेदारांना सुमारे 1839 एकर क्षेत्रापैकी 1528 क्षेत्र पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात येणार आहे.तसेच सुमारे 311 एकर क्षेत्रामध्ये रस्ते,ओढे, नाले, वने व धरण सुरक्षेकरिता क्षेत्र ठेवले जाणार आहे.
5. ज्या शेतकऱ्यांकडे पुरावे आहेत परंतु ते खातेदार नाहीत,अशा शेतकऱ्यांना देखील समाविष्ट केले जाईल.त्या शेतकऱ्यांनी सर्व माहिती व कागदपत्रांसह पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांच्याकडून संपूर्ण प्रस्ताव आठ दिवसांमध्ये पुनर्वसन विभागाकडे मंत्रालय स्तरावर पुढील आठ दिवसात सादर करण्याचे निर्देश मा.मंत्री महोदयांनी दिले आहेत. त्यानंतर पुढील आठ दिवसात अंमलबजावणी केली जाईल.

अधिक वाचा –
– जवण – तुंग मार्गावर जीवघेणे खड्डे ! वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न कधी मार्गी लागणार ? सामान्यांना जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास
– ‘राज्यात आमचे 105 आमदार तरीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री’, प्रवीण दरेकरांनी श्रीरंग बारणेंना शेलक्या शब्दात सुनावले । Pravin Darekar criticizes MP Shrirang Barne
– घरातील कोंबडी न सांगता विकली म्हणून पत्नीने केली बडबड, पतीची आत्म’हत्या; मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार


dainik maval jahirat

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला नेमकं काय आलं ? वाचा सविस्तर

Next Post

मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांसाठी सरकारचे प्रमुख 5 निर्णय, एका क्लिकवर वाचा सर्व निर्णय । Pavana Dam Affected Farmers News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
maval pavana dam affected 764 farmers will get 4 acres of land

मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांसाठी सरकारचे प्रमुख 5 निर्णय, एका क्लिकवर वाचा सर्व निर्णय । Pavana Dam Affected Farmers News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MLA Sunil Shelke has decided not to celebrate his birthday following sad demise of late Ajit pawar

स्व. अजितदादांच्या दुःखद निधनामुळे आमदार सुनील शेळके यांच्याकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

October 19, 2026
Flood-affected citizens in Lonavala will receive government financial aid before Diwali

लोणावळ्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदतीचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा!

October 19, 2026
Thrilling Rescue at lonavala Successfully Saves Mother Daughter Who Fell into Gorge at Tiger Point

आई व मुलीच्या बचावाचा थरार !! टायगर पॉइंट येथे दरीत पडलेल्या माय लेकींचे प्राण वाचविण्यात बचाव पथकाला यश

October 19, 2026
Balloon sellers attack each other with knives in Lonavala bloody altercation breaks out between two individuals

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

October 17, 2026
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.