व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जवण – तुंग मार्गावर जीवघेणे खड्डे ! वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न कधी मार्गी लागणार ? सामान्यांना जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास

पवन मावळ विभागातील जवण ते तुंग रस्त्यावर जवण क्रमांक 3 येथे असलेला रस्ता काही केल्या होताना दिसत नाही. गेले कित्येक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबितच आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 12, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Potholes on Javan to Tung road in Pawan Maval area

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवन मावळ विभागातील जवण ते तुंग रस्त्यावर जवण क्रमांक 3 येथे असलेला रस्ता काही केल्या होताना दिसत नाही. गेले कित्येक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबितच आहे. पूर्वी जेव्हा हा रस्ता झाला होता, तेव्हा एकपदरी रस्ता होता. कालांतराने हा रस्ता खराब होत गेला, त्यात मोठमोठे खड्डे पडले. त्यानंतर मागील दोन वर्षांपासून या मार्गाचे काम सुरु आहे. परंतू हे काम अत्यंत संथगतीने सुरु असल्याचे दिसत आहे. त्यातही जवण ते तुंग मार्गावर जवण क्रमांक 3 येथील हा रस्त्याचा भाग काहीकेल्या पूर्ण होताना दिसत नाही, अन् इथेच नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. (  मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

जवणपासून पुढे या रस्त्यावर घारेवस्ती, अजिवली, जाधववाडी, वाघेश्वर, शिळींब, बोडशिळ, डोंगरवाडी, चावसर, मोरवे ते तुंग आदी गाव आहेत. या गावांतील हजारो लोकं आणि शेकडो वाहने दररोज याच रस्त्यावरून ये-जा करत असत असतात. आमदार सुनिल शेळके यांच्या काळात जवण ते तुंग रस्त्यावरील अन्य ठिकाणचे काम झाले आहे. परंतू ऐन घाट रस्ता आणि चढाईचा मार्ग असलेल्या या ठिकाणचा रस्ता मात्र काही केल्या होत नाही. मध्यंतरी हा रस्ता वाढवण्याचे आणि सुधरवण्याचे काम सुरु झाले होते. परंतू काहीकारणाने ते काम होऊ शकले नाही. आता बरोबर दोन पावसाळे झालेत, हा मधला रस्ता खचून तिथे खड्डे पडलेत. तसेच लालमातीचा चिखलही होतो आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथे नागरिकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. ( Potholes on Javan to Tung road in Pawan Maval area Locals and tourists are suffering )

पवन मावळातील या भागातील शेकडो विद्यार्थी, कामगार, व्यवसायिक, सामान्य नागरिक यांना दररोज कामानिमित्त या मार्गावरून ये-जा करावी लागते. वाहन कोणतेही असो, या ठिकाणाहून पुढे जाताना त्यांचे हालच होत असतात. छोट्या गाड्या, चारचाकी यांच्यासाठी तर हे दिव्यच असते. येथे वाहन खराब होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे पूर्ण रस्ता होईल तेव्हा होईल, दोन पदरी रस्ता होईल तेव्हा होईल परंतू किमान एकपदरी तरी रस्ता आणि तोही लवकर पूर्ण करावा आणि दिलासा द्यावा, अशी स्थानिकांची माफक अपेक्षा आहे.

“पिरंगुट येथे दररोज कामावर जात असताना या मार्गावरून जावे लागते. आता पाऊस सुरु होतोय. पहिल्याच पावसात येथे चिखल झाला आहे. चिखल झाल्याने दुचाकी अनेकदा स्लीप होते. एकदा मी स्वतः येथे पडलो होतो. खड्डा आणि चिखल यामुळे गाडी चालवणे अवघड होते. तसेच दुसरा मार्गही आम्हाला नाही. हा रस्ता होणे खूप गरजेचे आहे. अनेकदा नवीन पर्यटक आल्याने येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने गाड्या फसतात. त्यामुळे ट्राफिक देखील होते. त्यामुळे येथे किमान खडी टाकून रस्ता जाण्यायेण्यासाठी सोईचा तरी करावा ही विनंती आहे” – शिवाजी कुंभार (स्थानिक नागरिक)

अधिक वाचा –
– मावळमधील विसापूर गडावरील शिवमंदिराचा आठवा जीर्णोद्धार वर्धापनदिन उत्साहात साजरा । Visapur Fort
– जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार । Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla
– शिंदे गटाबाबत हा दुजाभाव का ? कॅबिनेट मंत्रिपद हुकल्यानंतर खासदार श्रीरंग बारणेंची संतप्त प्रतिक्रिया । Shiv Sena Maval MP Shrirang Barne


dainik maval jahirat

Previous Post

‘राज्यात आमचे 105 आमदार तरीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री’, प्रवीण दरेकरांनी श्रीरंग बारणेंना शेलक्या शब्दात सुनावले । Pravin Darekar criticizes MP Shrirang Barne

Next Post

‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या । दैनिक मावळ विशेष

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
SRT

'एसआरटी' म्हणजे नक्की काय रे भाऊ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या । दैनिक मावळ विशेष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.