ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (रुडसेटी) तळेगाव दाभाडे यांच्यामार्फत बेसिक फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी मोफत प्रशिक्षण शिबिराचे 18 जून ते 17 जुलै दरम्यान वराळे (ता. मावळ) येथील प्रशिक्षण केंद्रात आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संचालक प्रवीण बनकर यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
स्वयंरोजगारासाठी व्यवसाय करण्याची तीव्र इच्छा असलेल्या ग्रामीण भागातील तरुणांसाठी महिनाभर आयोजित या प्रशिक्षण शिबिरामध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग संदर्भातील फोटोशॉप, वाइल्डलाइफ फोटोग्राफी, लग्न समारंभाची फोटोग्राफी आदींचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकांचा समावेश असेल. याबरोबरच व्यवसाय करण्यासाठी आवश्यक गुण, कौशल्य, मार्केट सर्व्हे, उद्योजकांची भेट तसेच सरकारच्या सुशिक्षित बेरोजगार कर्ज योजना, मुद्रा, पेळान, प्रकल्प अहवाल तयार करण्याविषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ( Free Training Camp in Basic Photography and Videography at Varale by RUDSETI Read more )
केवळ 35 जणांच्या तुकडीसाठी 18 जूनपासून सुरू होणाऱ्या 30 दिवसीय शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थीना मोफत निवास, चहा, नाता, जेवण उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारत सरकारकडून स्किल इंडिया आणि एनसीव्हिटी, दिल्ली अंतर्गत प्रमाणपत्र दिले जाते. इच्छुक प्रशिक्षणार्थी हा ग्रामीण भागातील असणे आवश्यक असून, त्याचे वय 18 ते 44 वर्षे दरम्यान असावे. इच्छुकांनी वराळे येथील रुडसेटी संस्थेत संपर्क करून नाव नोंदणी करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये झाला मुलीचा जन्म, मुस्लीम कुटुंबीयांनी मुलीचे नाव ठेवले ‘महालक्ष्मी’, लोणावळा स्थानकावरील घटना
– अजिवली शाळेतील शिक्षिका वर्षा बारबोले यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार
– मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांसाठी सरकारचे प्रमुख 5 निर्णय, एका क्लिकवर वाचा सर्व निर्णय । Pavana Dam Affected Farmers News