पुणे : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन केले असून सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील पक्षकार किंवा त्यांच्या वकिलांनी त्यांचे संमती अर्ज संपर्क क्रमांक आणि ई-मेल पत्त्यांसह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ई-मेल पत्ता pune-disa.mh@bhc.gov.in वर किंवा प्रत्यक्षरित्या सादर करावेत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांनी केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने पुणे जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणापैकी काही प्रलंबित प्रकरणांची यादी जिल्हा न्यायालयाच्या https://pune.dcourts.gov.in/ या संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. प्रलंबित प्रकरणे सदर विशेष लोकअदालतीमध्ये निकाली काढण्यात येणार आहेत. विशेष लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणांबाबतच्या नोटीसा संबंधित पक्षकारांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत बजावण्यात आल्या आहेत. विशेष लोकन्यायालयापूर्वी त्यांच्या तडजोडीच्या चर्चेची तारीख पक्षकार आणि वकिलांना दिली जाईल. ( Special Lok Adalat Week organized in Supreme Court from 29th July to 3rd August )
पक्षकार प्रत्यक्षपणे किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे देण्यात येणाऱ्या लिंकवर दूरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) उपस्थित राहू शकतात, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी कळविले आहे.
अधिक वाचा –
– पत्रकार परिषद सुरु होती आणि तेवढ्यात आमदार सुनिल शेळके यांचा फोन आला… । Talegaon Dabhade
– मोठी बातमी ! आमदार शेळकेंचा मास्टरस्ट्रोक, तळेगाव नगरपरिषदेच्या वाढीव कर आकारणीला राज्य सरकारची स्थगिती । Talegaon Dabhade
– ‘रुडसेटी’ संस्थेमार्फत वराळे येथे बेसिक फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे मोफत प्रशिक्षण शिबिर, जाणून घ्या । Talegaon Dabhade