महिलांना रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक लाभ मिळावा, यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळच्या (मविम) बचत गटांकडून शाळेचे गणवेश शिलाई करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील इयत्ता 1 ली ते 8 पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व अनुसूचित प्रवर्गातील मुले, तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले, यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. ( Decision to get school uniforms stitched by shg groups for employment to women )
गणवेश शिवणकाम महिलांना देण्यापूर्वी गावाचे मॅपिंग करण्यात आले तसेच महिलांची संख्या निश्चित करण्यात आली. महिला दिवसाला किती गणवेश शिवतात याची संख्या काढून त्यानुसार गणवेश संख्या देण्यात आली आहे.
आता शाळा सुरू झाल्या असून राज्यभरात गणवेश वाटपही सुरू झाले आहे. या निर्णयामुळे मुलांना गणवेश वेळेत मिळण्यास मदत झाली, तसेच महिलांना मोठ्या प्रमाणत रोजगार प्राप्त होत असल्याचेही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– वडगाव शहरातील महिलांसाठी मोरया प्रतिष्ठानमार्फत ‘व्यवसाय प्रशिक्षण आपल्या दारी’ उपक्रम । Vadgaon Maval
– आख्ख्या तालुक्यात होतेय चर्चा ! ‘तळेगावकरांच्या सुरक्षिततेसाठी, 1 रुपयाचे दान सीईओच्या व्यसनमुक्तीसाठी’ । Talegaon Dabhade
– मोठी बातमी ! येत्या 27 जूनपासून मुंबईत राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, ‘इतके’ दिवस चालणार अधिवेशन