व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ मतदारसंघातील विजयात महायुतीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांचा मोठा वाटा – खासदार श्रीरंग बारणे । Maval Lok Sabha

पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या वतीने खासदार बारणे यांचा सत्कार; खासदारकीच्या 'हॅटट्रिक'चे श्रेय सर्वसामान्य मतदारांना - श्रीरंग बारणे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 16, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
MP Shrirang Barane

Photo Courtesy : Team Dainik Maval


राज्यात वेगळे वारे वाहत असतानाही मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची खासदारकीची हॅटट्रिक झाली याचे सर्व श्रेय सर्वसामान्य व सूज्ञ मतदारांना जाते, असे उद्गार मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी काढले. निवडणुकीत प्रचंड मेहनत घेणारे शिवसैनिक व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा आपल्या विजयामध्ये मोठा वाटा असल्याचे बारणे यांनी यावेळी सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ लोकसभा मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या वतीने खासदार बारणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसैनिकांच्या वतीने फुलांनी सजवलेला मोठा धनुष्यबाण देऊन मोठ्या जल्लोषात बारणे यांना गौरविण्यात आले. खासदार बारणे व शिवसेनेच्या जयघोषात शिवसैनिकांनी )मोठ्या जल्लोषात विजयोत्सव साजरा केला. ( On behalf of Pimpri-Chinchwad Shiv Sena MP Shrirang Barane was felicitated )

  • बारणे म्हणाले की, आपण गेल्या दहा वर्षात केलेली विकास कामे, नागरिकांशी सातत्याने ठेवलेला संपर्क तसेच शिवसैनिक आणि महायुतीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घेतलेली मेहनत यामुळे मतदारांनी आपल्याला सलग तिसऱ्यांदा निवडून देऊन देशातील सर्वोच्च अशा संसदेत पाठवले आहे. मतदारांनी दाखवलेल्या या विश्वासाबद्दल मी सदैव त्यांचा ऋणी राहीन. पिंपरी-चिंचवडकरांनी मोठे मताधिक्य दिल्यामुळे आपला विजय सोपा झाला पिंपरी चिंचवड शहरातील मतदारांचे बारणे यांनी विशेष आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा एनडीए सरकार केंद्रात सत्तेवर आले आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारही चांगले काम करीत आहे. मावळ मतदारसंघात सुरू असलेली तसेच प्रस्तावित विकास कामे मार्गी लावण्यासाठी यापुढेही आपण पाठपुरावा करू आणि मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून दाखवू, असे बारणे यांनी सांगितले.

MP Srirang Barane was felicitated
MP Srirang Barane was felicitated

मागील गोष्टी उगाळत बसण्याऐवजी शिवसैनिकांनी नव्या जोमाने पुन्हा कामाला लागावे. असे आवाहन बारणे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेत्रदीपक यश संपादन करून नवा इतिहास घडवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांच्या भाषणातून खासदार बारणे यांचे अभिनंदन केले.

अधिक वाचा –
– शाळेचा पहिला दिवस ठरला अविस्मरणीय ! पवना शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत । Pavananagar
– वडगाव शहरातील महिलांसाठी मोरया प्रतिष्ठानमार्फत ‘व्यवसाय प्रशिक्षण आपल्या दारी’ उपक्रम । Vadgaon Maval
– आख्ख्या तालुक्यात होतेय चर्चा ! ‘तळेगावकरांच्या सुरक्षिततेसाठी, 1 रुपयाचे दान सीईओच्या व्यसनमुक्तीसाठी’ । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

महिलांना रोजगार आणि आर्थिक लाभासाठी बचत गटांकडून शाळेचे गणवेश शिलाई करून घेण्याचा निर्णय

Next Post

भारत हा जगातील सर्वात जास्त मांजर पालन करणारा देश – साकीब पठाण । Khopoli News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
cat

भारत हा जगातील सर्वात जास्त मांजर पालन करणारा देश - साकीब पठाण । Khopoli News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.