व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शाळेचा पहिला दिवस ठरला अविस्मरणीय ! पवना शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत । Pavananagar

पवनानगर - पवना शिक्षण संकुलातील नवीन विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत आणि झाडांची रोपे देऊन स्वागत

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 15, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Students warm welcomed Pavananagar

Photo Courtesy : Team Dainik Maval


शनिवारपासून (दि. 15) नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. प्रशासनाने मराठी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पवना विद्या मंदिर,लायन शांता मानेक ज्युनियर कॉलेज तसेच कै. सौ‌. मिराबाई दशरथ भोंगाडे पवना प्राथमिक विद्या मंदिर शाळेतील सर्व नविन विद्यार्थांंचे आज ढोल ताशा लेझिमच्या गजरात स्वागत करण्यात आले. तसेच विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर गुलाबांच्या पाकळ्यांची उधळण करत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यासह नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव व शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे यांच्या संकल्पनेतून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संस्था अंर्तगत शाळांमध्ये एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड व संवर्धन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. त्यानुसार काले पवनानगर ग्रामपंचायतींच्या उपसरपंच योगिता मोहोळ यांच्या हस्ते संकुलातील 1000 विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक देशी झांडाचे रोप देण्यात आले.

यावेळी संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे, माजी विद्यार्थी यांंच्यासह संकुलातील सर्व विभागाचे प्रमुख व सर्व अध्यापकांच्या हस्ते नविन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांंना पुस्तके तसेच झाडांचे वाटप करण्यात आली. यावेळी बोलताना प्राचार्य भाऊसाहेब आगळमे म्हणाले की, संस्थेच्या उपक्रमानुसार संकुलातील प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांना एक झाड देण्यात आले असून प्रत्येकाने त्यांचे लागवड करुन संवर्धन करायचे आहे. ( Students warm welcome to Pawna Education Complex in Pavananagar with dhol & tasha )

एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड व संवर्धन उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी –
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे संस्थेच्या वतीने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून यावर्षी पासून एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड व संवर्धन या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. त्यानुसार संस्था अंर्तगत ६ माध्यमिक ,२ प्राथमिक,४ उच्च माध्यमिक विद्यालयात शाळेच्या पहिल्याच दिवशी एकूण ५००० वृक्षांचे वाटप करण्यात आले.

सदर उपक्रमात प्रत्येक विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी ते झाड लावून त्याचे संवर्धन करावे त्याचे निरीक्षण व पाहणी करण्यासाठी एक समिती तयार करुन त्याचा अहवाल सादर केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला संस्थेमार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, संस्थेचे सचिव संतोष खांडगे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, संचालक सोनबा गोपाळे, महेश भाई शहा, दामोदर शिंदे व सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु राहणार आहे.

अधिक वाचा –
– मोठी बातमी ! येत्या 27 जूनपासून मुंबईत राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, ‘इतके’ दिवस चालणार अधिवेशन
– पालखी सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातील तयारी अंतिम टप्प्यात; वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा – अजित पवार
– शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खतांचा वेळेवर पुरवठा करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश । Pune News


Previous Post

वडगाव शहरातील महिलांसाठी मोरया प्रतिष्ठानमार्फत ‘व्यवसाय प्रशिक्षण आपल्या दारी’ उपक्रम । Vadgaon Maval

Next Post

कार्ला येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत, गावातून काढली वृक्ष दिंडी । Karla News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
warm welcome for students

कार्ला येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत, गावातून काढली वृक्ष दिंडी । Karla News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.