व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भारत हा जगातील सर्वात जास्त मांजर पालन करणारा देश – साकीब पठाण । Khopoli News

हल्ली मांजर पाळणाऱ्यांची संख्या भारतात झपाट्याने वाढत आहे किंबहुना मांजर पालन क्षेत्रात भारत हा जगात अव्वल ठरत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 16, 2024
in मावळकट्टा, देश-विदेश, महाराष्ट्र
cat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Khopoli News : हल्ली मांजर पाळणाऱ्यांची संख्या भारतात झपाट्याने वाढत आहे किंबहुना मांजर पालन क्षेत्रात भारत हा जगात अव्वल ठरत आहे. उंदरांचा खात्मा करण्यासाठी मांजर पाळणे हा उद्देश मागे पडला असून हल्ली मांजर पालन हा प्रेस्टीजचा विषय झाला आहे. कोविड काळात जनजीवन ठप्प झालेले असताना पाळीव प्राण्यांसोबत आपल्या भावना व्यक्त करणाऱ्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली, त्यात मांजर हा आर्थिक दृष्ट्या परवडणारा प्राणी असल्याने अनेकानी तो पर्याय निवडला होता, असे प्रतिपादन फीलाईन क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष साकीब पठाण यांनी केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मांजर हा प्राणी मुलत: आफ्रिकेतला आहे, त्याची उत्पत्ती ही वाळवंटातली असल्याने तो कमी पाण्यावर जगणारा मात्र पुर्णतः मांसाहारी असतो. त्यामूळे त्याचेवर शाकाहार लादणे अन्यायकारक असल्याचे मत श्री कृपा एक्वेरियम खोपोली आणि हेल्प फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सेमिनारमध्ये रोटरी क्लब ऑफ खोपोलीच्या सभागृहात मोठया संख्येने उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पठाण यांनी व्यक्त केले. ( India is country with largest number of cat breeders in the world )

मांजर हा प्राणी जेवढा पाळीव म्हणून प्राणी मित्रांना आवडू लागला आहे, तेवढाच तो व्यवसायाच्या दृष्टिकोनातून नवा आणि पूरक पर्याय म्हणून पूढे येत असल्याचे सांगताना मांजरांच्या अंगभूत असलेल्या सवयींच्या अनुषंगाने जर पालन पोषण झाले तर वेगळा आनंद आणि समाधान प्राप्त होईल, असा सल्ला यावेळी त्यांनी मांजर प्रेमींना दिला. जेष्ठ पशूवैद्य डॉ. राहुल मुळेकर यांनी मांजरांचे लसीकरण, विविध आजार, संगोपन आणि उपचारा संदर्भात मार्गदर्शन केले.

रोटरी क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. सावित्री रघुपती, श्री कृपा एक्वेरियमचे संचालक प्रवीण शेंद्रे, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, रोटरी क्लबचे मिलिंद बोधणकर, प्राणीमित्र सुफियान शेख इत्यादी मान्यवरांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. साजिद खान, रशीद खान, गौरव वारिया, अल्ताफ पटेल, राहुल गायकर हे प्राणी मित्र तसेच अस्मित पाटील, करण सुटे, अक्षय जाधव, राज पाटील, इत्यादी मांजरांचे पैदास करणारे ब्रिडर यांनी या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. रोझारी टॉप टेल, नेस्ले पुरीना, Drools, सिग्नेचर इत्यादी मांजरांसाठी खाद्य उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी या सेमिनारमध्ये सहभाग नोंदावला होता. या निमीत्ताने मांजर प्रेमींना एक अनोखी पर्वणी लाभल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली गेली.

अधिक वाचा –
– कार्ला येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत, गावातून काढली वृक्ष दिंडी । Karla News
– शाळेचा पहिला दिवस ठरला अविस्मरणीय ! पवना शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत । Pavananagar
– वडगाव शहरातील महिलांसाठी मोरया प्रतिष्ठानमार्फत ‘व्यवसाय प्रशिक्षण आपल्या दारी’ उपक्रम । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

मावळ मतदारसंघातील विजयात महायुतीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांचा मोठा वाटा – खासदार श्रीरंग बारणे । Maval Lok Sabha

Next Post

माशाच्या जाळ्यात अडकलेल्या भल्या मोठ्या अजगराची सर्पमित्रांकडून सुटका । Khopoli News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Rescue of python trapped in fish net

माशाच्या जाळ्यात अडकलेल्या भल्या मोठ्या अजगराची सर्पमित्रांकडून सुटका । Khopoli News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.