मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प कामाची पाहणी करण्यासाठी गुरुवार (दिनांक 10 नोव्हेंबर) रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. ओझर्डे येथे हेलिकॉप्टरमधून उतरुन ते मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम पाहण्यासाठी रवाना झाले. या दरम्यान स्थानिक नागरिक आणि विविध पक्षाच्या, संघटनांच्या नेत्यांनी, ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. तसेच, त्यांच्याजवळ विविध मागण्यांची निवेदने दिली. ( Service Road Demand Near Mumbai Pune Expressway BJP Taluka President Ravindra Bhegde Letter To CM Eknath Shinde )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय जनता पार्टीचे मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन त्यांच्याकडे तालुक्यातील विविध समस्यांची मांडणी करत, काही मागण्यांचे निवेदन सादर केले. यात प्रामुख्याने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, याप्रमाणेच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगतच्या गावांतील नागरिकांसाठी सर्व्हिस रोड बनवावा, ही मागणी करण्यात आली.
मावळ तालुक्यामधून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग यासह जुना मुंबई-पुणे महामार्ग म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हाही जातो. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक गावे, शहरे आहेत. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग लगत आणि जुना मुंबई पुणे महामार्गालगत सर्व्हिस रोड करावा, ही अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत आहे.
त्या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत गहुंजे ते कुसगाव-लोणावळा दरम्यान लगतच्या गावांच्या दळणवळणासाठी द्रुतगती मार्गालगत सर्व्हिस रोड ( सेवा रस्ता ) करावा, तसेच या सर्व्हिस रोडच्या खडी डांबरीकरणाचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी रविंद्र भेगडे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली. ( Service Road Demand Near Mumbai Pune Expressway BJP Taluka President Ravindra Bhegde Letter To CM Eknath Shinde )
अधिक वाचा –
– पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, रविंद्र भेगडे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी
– Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रोजेक्टची पाहणी