लोणावळा येथे शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या वतीने लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट येथे पक्षाच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. तसेच पक्षाच्या 58व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून परिसरात वड, पिंपळ, बदाम, पळस आदी 58 वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी मच्छिंद्र खराडे, शाम वाल्मिकी, सुनिल इंगुळकर, मनोज सावंत, अजय ढम, सतीश गोणते, तेजस खराडे, योगेश जाधव, सनी साळुंखे, भीमा शिंगाडे, सुनिल कदम, इंदर, चोबेजी, पांडुरंग आखाडे, योगेश येवले, दत्ता साळुंखे आदीजण उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दिनांक 19 जून हा शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन. बुधवारी शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन होता. 19 जून 1966 रोजी शिवसेना पक्षाची स्थापना झाली. मराठी लोकांची संघटना म्हणून आधी शिवसेनेचा उदय झाला. त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून छत्रपती शिवाजी महाराज की जय असा उद्घोष करत बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. ( Cleanliness drive with tree plantation in Lonavala on occasion of Shiv Sena party 58th anniversary )
मावळ तालुक्यात शिवसेना पक्षाचा मोठा जनाधार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिलेला, वावरलेला आणि त्यांना मानणारा कट्टर शिवसैनिक मावळात आहे. तर 2019 च्या पक्षपक्ष फुटींतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्हींच्या विचारांनी चालणारा शिवसैनिकही मावळात दिसत आहे. 2009 पासून मावळात शिवसेना पक्षाचा खासदार आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनासह बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, पुण्यतिथी निमित्ताने मावळ तालुक्यात दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
अधिक वाचा –
– ताजे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी मच्छिंद्र केदारी यांची निवड । Maval News
– खंडाळा एक्झिट ते वलवण एक्झिट दरम्यान सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– मोठा निर्णय ! पांढरे रेशनकार्ड धारकांनाही मिळणार महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेचा लाभ