व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खंडाळा एक्झिट ते वलवण एक्झिट दरम्यान सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

देशभरातील पर्यटकांसाठी लोणावळा हे शहर पावसाळी पर्यटनासाठी क्रमांक 1 चे पसंतीचे शहर आहे. परंतू लोणावळा शहर आणि परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका येथील पर्यटन व्यवसायाला बसतो आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 20, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
Entry ban for heavy vehicles in Lonavala

Photo Courtesy : Team Dainik Maval


Entry ban for heavy vehicles in Lonavala : देशभरातील पर्यटकांसाठी लोणावळा हे शहर पावसाळी पर्यटनासाठी क्रमांक 1 चे पसंतीचे शहर आहे. परंतू लोणावळा शहर आणि परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका येथील पर्यटन व्यवसायाला बसतो आहे. त्यातही लोणावळा शहरातून जाणारा जुना मुंबई पुणे महामार्गावर अवजड वाहन चालकांकडून बळजबरीने वाहने घुसवली जातात, त्याचाही फटका बसून वाहतूक कोंडी होते. त्यावर आता प्रशासनाने कायम स्वरूपी तोडगा काढला असून जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशान्वये पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग जुना – 4 येथील खंडाळा एक्झिट ते वलवण एक्झिट दरम्यान सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जड – अवजड वाहतूक कायस्वरूपी बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

लोणावळा शहरातून जुना पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जातो. त्यात लोणावळा शहरामध्ये शनिवार, रविवार तसेच इतर सार्वृजनिक सलग सुट्या असतात, तेव्हा पर्यटक मोठ्या प्रमाणात लोणावळा शहरात दाखल होतात. पुणे-मुंबई व मुंबई- पुणे या मार्गावर जड-अनजड वाहनांना एक्सप्रेस हायवे रोड उपलब्ध असतानाही ही जड- अवजड वाहने शहरातून ये- जा करतात, त्यामुळे लोणावळा शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीची आणि अपघाताची समस्या निर्माण होत असते. त्यासाठी लोणावळा शहरात वाहतुक कोंडी टाळण्यासाठी उपाय योजना म्हणून जुना पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्ग – ४ येथील खंडाळा एक्झिट ते वलवण एक्झिट दरम्यान सकाळी 6 वा. ते रात्री 10 वाजेपर्यंत जड-अवजड वाहतुक कायम स्वरुपी बंद ठेऊन ही वाहतुक पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरुन सुरु ठेवणेत यावी, अशा प्रकारची अधिसुचना करण्याची विनंती पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांनी प्रस्तावाद्वारे केली होती. ( Entry ban for heavy vehicles in Lonavala city Orders by Collectors )

याप्रस्तावाची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यांनी लोणावळा शहरातील जड-अवजड वाहनांमुळे होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी उपाय योजनाम्हणून जुना पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्ग -४ येथील खंडाळा एक्झिट ते वलवण एक्झिट दरप्यान कायम स्वरुपी सकाळी 6 वा. ते रात्री 10 वाजेपर्यंत जड-अवजड वाहनांची वाहतुक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यादरम्यान जड- अवजड वाहनांची वाहतुक पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे वरुन सुरु ठेवता येणार आहे.

अधिक वाचा –
– ‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील’ – सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील
– ‘लोकसभेच्या मतदानाचा सकारात्मक विचार करून विधानसभेच्या तयारीला लागूया’, पनवेल येथे खासदार बारणेंचा जंगी सत्कार
– मावळ तालुक्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या फुलाबाई काळे यांचे निधन । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

एआय (AI) तंत्रज्ञानाद्वारे मावळमध्ये 70 वर्षीय आजोबांचा कर्करोग झाला बरा ! तळेगाव येथे राज्यातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

Next Post

वडगाव येथे भीषण अपघात, स्कूल बसला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर दुकानात घुसला, महिला ठार बालके जखमी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Horrible accident at Vadgaon Maval

वडगाव येथे भीषण अपघात, स्कूल बसला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर दुकानात घुसला, महिला ठार बालके जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.