हल्लीच्या काळातील मुले खुप हुशार आहेत. असे वाक्य आपल्या नेहमीच कानावर पडत असते आणि हे खरेही आहे. अलिकडील पिढीतील मुले ही आकलनक्षमता प्रबळ असलेली आहेत, यात शंका नाही. त्यामुळे आपण न करू शकलेला किंवा न पाहिलेले असे अनेक दिव्य या पिढीच्या हातून घडताना दिसतं. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अलिकडच्या काळात लहान मुले वेगळ्या प्रकारचे छंद जोपासून आगळावेगळा विक्रम करतात. काही मुले विविध स्पर्धा किंवा परीक्षेत उत्तुंग यश मिळवून सर्वांना थक्क करून सोडतात. एवढेच काय दहावी-बारावीला पास होऊन फर्स्ट क्लासचे स्वप्न पाहणारी पिढीला जेव्हा आज 100 पैकी 100 टक्के मार्क पाडणारे विद्यार्थी दिसतात, तर नक्कीच थक्क व्हायला होते. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील मुलगा वैष्णव शैलेश काकडे यानेही आता सर्वांना चकित करणारे काम केले आहे. ( Vaishnav Kakade student from Talegaon Dabhade succeeded in various competitions examinations )
तळेगावच्या वैष्णवने एकाचवेळी अनेक स्पर्धा, परीक्षा, खेळामध्ये सहभाग घेत उत्तम यश संपादन केले आहे. विविध राज्यस्तरीय, देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आणि स्पर्धामध्ये सहभाग नोंदवत चमकदार कामिगिरी करून वैष्णवने सर्वांना अचंबित केले आहे. त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.
वैष्णवने, खुला आसमाँ 2023 (ऑक्टो-डिसेंबर) स्पर्धेत यशस्वी, डब्ल्यू.एफ.पी.सी. स्पर्धेत यश, आय.ए. ए.सी. स्पर्धेत विजय, क्लायमेट सायन्स ऑलिंपियाड सेमी-फायनलिस्ट, एनएसयीपी, एनएसयीए, एनएसयीसी, आयओक्यूएम आणि व्हीव्हीएम सहभाग, आयएएसी शर्यगिन ऑलिंपियाड सहभाग व निवड, एमआयटी व हार्वर्ड विद्यापीठाच्यावतीने सन्मानित, आर्यभट्ट गणित स्पर्धा 2024 मध्ये निवड, इंटरनॅशनल सायन्स ऑलिंपियाड स्पर्धेत निवड, भगवद गीता स्पर्धेत प्रमाणपत्र प्राप्त या स्पर्धासोबतच बाल कवी संमेलनात उत्स्फूर्तपणे सहभागी होत कला सन्मान मिळविला.
आपल्या यशामागे आई, वडील आणि गुरूजणांचा मोठा हात आहे. काहीतरी करून दाखविण्याच्या जिद्दीमुळे अथक परिश्रम करण्याची सवय लागली आणि हे यश म्हणजे त्याचेच फलित आहे, असे वैष्णव काकडे आपल्या यशाबद्दल सांगतो.
अधिक वाचा –
– इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान तातडीने हाती घ्यावे; रविंद्र भेगडे यांचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन । Maval News
– ‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ योजनेअंतर्गत मावळ वनविभागाकडून 2 लाख रोपे विक्रीसाठी उपलब्ध; नागरिकांना सवलतीच्या दरात मिळणार रोपे
– ताजे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी मच्छिंद्र केदारी यांची निवड । Maval News