व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, November 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

माणूसपण हरवत चाललेल्या जगात माणूसकीचा नवा आदर्श घडवणारे मावळ तालुक्यातील ‘सावंतवाडी’ गाव आणि तेथील ग्रामस्थ !

हल्लीच्या काळात माणूसकी हरवत चालली आहे, असे नेहमीच म्हटले जाते. परंतू ही झाली फक्त नाण्याची एक बाजू.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 20, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Financial assistance for education of children

Photo Courtesy : Team Dainik Maval


हल्लीच्या काळात माणूसकी हरवत चालली आहे, असे नेहमीच म्हटले जाते. याला कारणीभूत म्हणजे प्रत्येकाला आलेले काही अनुभव असतात किंवा डोळ्यांनी पाहिलेले काही प्रसंग असतात. परंतू ही झाली फक्त नाण्याची एक बाजू. आपल्या आजूबाजूला नकळत अशाही काही गोष्टी घडत असतात, ज्यातून समाजातील माणूसपण टिकवून ठेवले जाते. मावळ तालुक्यात देखील माणूसपण जिवंत ठेवणारी आणि सामाजातील एकोपा वाढवणारी एक घटना घडली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुक्यातील सावंतवाडी या गावाने माणूसकीचा नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. सावंतवाडी गावातील सामान्य कुटुंबातील शेतकरी मुकुंद नथू घायाळ यांचे काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले. गावातील एखादा व्यक्ती जेव्हा जातो, तेव्हा ते दुःख कुणा एकाच्या घरातील नसते, तर संपूर्ण गावाचे असते, ही गोष्ट गावात राहिलेला व्यक्ती लवकर समजू शकतो. कै. मुकुंद घायाळ यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि चार मुली यांच्या पाठीवरचा आधाराचा हात कायमचा पारखा झाला. ( Financial assistance for education of children who lost their father from Sawantwadi villagers Maval )

  • दिनांक 15 जून रोजी राज्यासह मावळ तालुक्यातील शाळाही सुरू झाला. शाळा सुरू म्हटल्यावर शाळेची फी, दप्तर, वह्या, गणवेश आदी गोष्टी आल्या. परंतू घरातील कर्ता गेल्याने चार लेकींच्या शिक्षणाची काळजी कै. मुकुंद यांच्या पत्नीला लागून राहिली होती. पतीच्या पश्चात खडतर आर्थिक परिस्थितीत मुलींचा सांभाळ करण्याचे दिव्य त्यांना करावे लागणार आहे. परंतू कै. मुकुंद यांच्या घराची आर्थिक परिस्थिती आणि घरावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगराची कल्पना गावकऱ्यांना नक्कीच होती. त्यामुळे गावकऱ्यांनी या गोष्टीचा योग्यरित्या विचार करत चांगल्या कृतीसाठी एकी केली.

‘आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो’, या उक्तीप्रमाणे सावंतवाडी गावातील आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, गावातील युवा कार्यकर्ते यांच्यासोबतच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आणि सावंतवाडीतील ग्रामस्थ मंडळी यांनी प्रत्येकाला जमेल तशी आर्थिक राशी एकत्र केली. ही राशी रोख स्वरूपात मुलींच्या पुढील शिक्षणासाठी ‘एक हात मदतीचा’ स्वरूपात श्रीमती घायाळा यांच्याकडे सुपूर्द केली. ग्रामस्थांच्या या आधाराने आणि मदतीने भारवलेल्या श्रीमती घायाळ यांनी गावकऱ्यांचे आभार मानले. सावंतवाडी ग्रामस्थांच्या या कृतीचे आता सर्व पंचक्रोशीत कौतूक होत आहे.

‘आमच्या गावातील कै. मुकुंद घायाळ यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही ग्रामस्थांनी आपापल्या परीने होईल तशी शक्य ती मदत केली. परंतू अशी परिस्थिती तालुक्यातील अन्य गावातही आहे. त्यामुळे त्या गावातील ग्रामस्थांना आमची विनंती आहे की, तुमच्या गावात असे कोणी कुटुंब असेल तर त्यांना तुम्ही शक्य होईल तितकी आर्थिक मदत करण्याचा नक्की प्रयत्न करा,’ असे आवाहन सावंतवाडी ग्रामस्थांनी केले आहे.

अधिक वाचा –
– ‘लोकसभेतील पराभवाने खचून न जाता पुन्हा ताकदीने मैदानात उतरू’, लोणावळा येथील बैठकीत ‘वंचित’चा निर्धार । Lonavala News
– शिवसेना पक्षाच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त लोणावळ्यात वृक्ष लागवडीसह स्वच्छता मोहिम । Lonavala News
– इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान तातडीने हाती घ्यावे; रविंद्र भेगडे यांचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

तळेगावच्या ‘वैष्णव’ची एकाचवेळी विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी । Talegaon Dabhade

Next Post

थरारक ! तळेगाव दाभाडे शहरात हवेत गोळीबार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Firing

थरारक ! तळेगाव दाभाडे शहरात हवेत गोळीबार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरण ; सिया गोयल हिच्या जामीन व खटल्यातून दोषमुक्त अर्जाला उज्ज्वल निकम यांचा विरोध

November 2, 2026
Members of Shivdurga Mitra organization rescued an injured young man who had lost his way on Visapur Fort

विसापूर किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या जखमी तरूणास शिवदुर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांनी वाचविले

November 2, 2026
Project-affected people surrounded high-level committee that had arrived to inspect the safety wall of the Pavana Dam

पवना धरणाच्या सुरक्षा भिंतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उच्चस्तरीय समितीला धरणग्रस्तांनी घातला घेराव

November 2, 2026
Kamshet-Police-Station

प्रभावी तपासातून आरोपीला शिक्षा! अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात कामशेत पोलिसांना यश

November 1, 2026
Major crackdown by Lonavala Rural Traffic Branch Action taken against 51 motorists for violating traffic rules

लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेची धडक कारवाई! नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 51 वाहनचालकांवर कारवाई

November 1, 2026
Grocery kits distributed to 70 families in Karanjgaon Mormarwadi Maval for Diwali

करंजगाव, मोरमारवाडी येथील ७० कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा संचचे वाटप ; विश्व हिंदू परिषद, ‘माऊली ग्रुप’चा स्तुत्य उपक्रम

October 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.