देहूगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी मयूर शिवशरण यांची निवड झाली आहे. देहू नगर पंचायतीच्या रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदासाठी नुकतीच निवड प्रक्रिया राबवण्यात आली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून उप जिल्हाधिकारी संजय असवले उपस्थित होते. बुधवारी (दि. 19) पार पडलेल्या निवड प्रक्रियेत मयूर शिवशरण यांची नगराचे उपाध्यक्ष म्हणून तर सुधीर काळोखे यांची पाणीपुरवठा व जलनि:सारण समितीच्या सभापतीपदी निवड झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
देहू नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष सुधीर काळोखे यांनी राजीनामा दिल्याने अडीच वर्षातील उपाध्यक्ष पदासाठी चौथी निवडणूक प्रक्रिया नगरपंचायत सभागृहामध्ये पार पडली. उपजिल्हाधिकारी संजय असवले हे निवडणूक प्रक्रिया अधिकारी होते, तसेच यावेळी देहू गावच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे, नगरसेवक-नगरसेविका, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. ( Mayur Shivsharan Elected as Deputy Mayor of Dehu Nagar Panchayat )
सकाळी 10 वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष पदासाठी मुख्याधिकारी यांच्याकडे नाम निर्देशन पत्र सादर करणे, पिठासीन अधिकारी यांनी नामनिर्देशन पत्राची छाननी करणे, नामनिर्देशन पत्र माघार घेणे, आवश्यकतेनुसार उपाध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची प्रक्रियेमध्ये मयूर शिवशरण यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
तर, स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती तसेच पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया देखील यावेळी पार पडली. उपनगराध्यक्ष हेच स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीचे पदसिद्ध सभापती असल्याने शिवशरण यांची तिथे सभापदी म्हणून निवड झाली, तर पाणीपुरवठा व जलनिःसारण समितीसाठी सुधीर काळोखे यांचा एकमेव अर्ज असल्याने काळोखे यांची पाणीपुरवठा व जल निस्सारण समितीच्या सभापती पदी निवड जाहीर झाली.
अधिक वाचा –
– वडगाव मावळ शहरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी, 250 महिलांना तुळशीच्या रोपांचे वाटप । Vadgaon Maval
– अर्धी लढाई जिंकली ! तळेगाव नगरपरिषदेच्या करवाढीस स्थगितीचा आदेश नगरविकास खात्याकडून जारी, आमदार शेळकेंच्या प्रयत्नांना यश
– वतन इनामी जमिनीबाबत कायदा करून कडक अंमलबजावणी व्हावी, रामोशी समाजाच्या जमिनी हडपल्या जात असल्याचा गंभीर आरोप