व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा महाविद्यालयात जागतिक योग दिवस साजरा ; योग अभ्यासकांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना दिले योगाचे धडे

कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लोणावळा येथे महाविद्यालय आणि रोटरी क्लब यांच्या माध्यमातून जागतिक योग दिवस 2024 साजरा करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 21, 2024
in मावळकट्टा, लोकल, शहर
World Yoga Day celebrated in Lonavala College

Photo Courtesy : Team Dainik Maval


World Yoga Day Celebrated In Lonavala College : कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लोणावळा येथे महाविद्यालय आणि रोटरी क्लब यांच्या माध्यमातून जागतिक योग दिवस 2024 निमित्त योग अभ्यास आणि प्रात्यक्षिके कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाच्याच माजी विद्यार्थीनी तथा योग अभ्यासक कु. वृषाली आंदेकर आणि कु. दिव्या शिर्के उपस्थित होत्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

त्यांनी महाविद्यालयातील उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना योग दिनानिमित्त संबोधित केले. तसेच दररोज सहजतेने करता येतील असे अनेक योगासने शिकवली आणि त्यांचे प्रात्यक्षिक करून घेतले. ‘सहजतेने आणि नियमित योगा केल्यामुळे असाध्य आजारांवर सहज मात करता येते’ याबद्दल दिव्या शिर्के यांनी मार्गदर्शन केले. तर वृषाली आंदेकर यांनी, ‘दररोजच्या जीवनात सोप्या योग साधना केल्यास प्रत्येक व्यक्तीला आरोग्यमय आयुष्याची हमी प्राप्त होते,’ असे सांगितले. ( World Yoga Day celebrated in Lonavala College International Yoga Day 2024 )

लोणावळा कॉलेज आणि रोटरी क्लब लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक वृषाली आंदेकर, दिव्या शिर्के यांसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख, उपप्राचार्य डॉ. विलास पाटील, रोटरी क्लब लोणावळा अध्यक्ष दिलीप पवार, श्री कुलकर्णी, नितीन कल्याण आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम प्रमुख डॉ. पवन शिनगारे, प्रा. रोहन वर्तक, डॉ. श्रीकांत होगले, सतीश गायकवाड, रवी उंबरे यांनी केले.

दरवर्षी 21 जून रोजी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा केला जातो. दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी एक विशेष थीम देखील असते. योगाच्या प्राचीन भारतीय पद्धती, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी त्याचे बहुआयामी फायदे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा केला जातो. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम ही ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’ अशी आहे.

अधिक वाचा –
– अर्धी लढाई जिंकली ! तळेगाव नगरपरिषदेच्या करवाढीस स्थगितीचा आदेश नगरविकास खात्याकडून जारी, आमदार शेळकेंच्या प्रयत्नांना यश
– वतन इनामी जमिनीबाबत कायदा करून कडक अंमलबजावणी व्हावी, रामोशी समाजाच्या जमिनी हडपल्या जात असल्याचा गंभीर आरोप
– मावळ तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळांची यादी वाचा एका क्लिकवर । List of All Tourist Places In Maval Taluka


Previous Post

जागतिक योग दिवस : तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून योगाभ्यास आणि योग प्रात्यक्षिके । International Yoga Day 2024

Next Post

देहूगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी मयूर शिवशरण यांची निवड । Dehu Nagar Panchayat

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Mayur Shivsharan Dehu Nagar Panchayat

देहूगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी मयूर शिवशरण यांची निवड । Dehu Nagar Panchayat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval taluka shaken Youth burnt along with bike body found in field along Mahagaon Dhalewadi road

मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला

April 28, 2026
Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
Crime

जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime

April 28, 2026
musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.