मागील 10 दिवसांपासून सुरू असलेले ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ चे उपोषण प्रा. लक्ष्मण हाके यांनी आज (दि. 22 जून) स्थगित केले आहे. सरकारचे शिष्टमंडळ आज, शनिवारी त्यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील काही मंत्री होते. शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी उपोषण स्थगित केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ओबीसी आरक्षण बचावाच्या मागणीसाठी प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे गेल्या 10 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषणाला बसलेले होते. त्यांच्या मागण्यांसंदर्भात नुकतीच सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती, तसेच काल सरकार व ओबीसी शिष्टमंडळ यांची बैठक पार पडली. या पार्श्वभूमीवर आज (दि. 22 जून) सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या शिष्टमंडळाने वडीगोद्री येथील उपोषणस्थळी भेट दिली. ( OBC Leader Laxman Hake Hunger Strike Suspended After Visit Of Government Delegation )
आंदोलन थांबले नाही स्थगित केले –
“आमच्या दोन मागण्या मंजूर केल्या आहेत. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश यायचा आहे, येण्याअगोदर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे. बैठक झाल्याशिवाय सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे बोगस कुणबीच्या नोंदीवर आक्षेप घेतला होता. खोटी कुणबी प्रमाणपत्र देणारे आणि घेणाऱ्यांवर कारवाई करू असं सरकारने सांगितलं आहे. मी एक कार्यकर्ता म्हणून माझं म्हणणं आहे की प्राधान्यक्रमाने प्रमाणपत्र ज्या सरकारने दिले त्या सरकारकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे, आता त्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण त्यावर लाखो हरकती नोंदवल्या आहेत, त्या हरकतींची श्वेतपत्रिका मिळत नाही, तोवर हे आंदोलन थांबवणार नाही. हे आंदोलन स्थगित झालेलं आहे. वरिष्ठ आणि संयोजन समितीच्या म्हणण्यावरून हे आंदोलन स्थगित केलं आहे,” असे हाके म्हणाले.
छगन भुजबळ यांनी यावेळी हाके आणि वाघमारे या ओबीसीच्या लढवय्यांचे संघर्षाबद्दल कौतुक केले. तसेच ओबीसी आंदोलकांच्या मागण्यांना अनुसरून ओबीसी आरक्षणास धक्का न लावण्यासंदर्भात सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या आश्वासनांचे पत्रक त्यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी 10 व्या दिवशी आपले उपोषण स्थगित केले. ओबीसींच्या हक्काचा लढा असाच सुरू राहील, असा विश्वास यावेळी भुजबळ यांनी उपस्थित ओबीसी बांधवांना दिला.
ओबीसी आरक्षण बचावाच्या मागणीसाठी प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे गेल्या १० दिवसांपासून जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषणाला बसलेले होते. त्यांच्या मागण्यांसंदर्भात नुकतीच सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती, तसेच काल सरकार व ओबीसी शिष्टमंडळ यांची बैठक पार पडली. या… pic.twitter.com/pXddOJAEeT
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) June 22, 2024
मनोज जरांगेंचा इशारा –
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे आश्वासन सरकारने दिल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषण स्थगित केले. त्यांचे उपोषण स्थगित होताच मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात नवा एल्गार पुकारला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाहीतर थेट मंडल कमिनशन विरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिली. ‘मराठ्यांनीही तुम्हाला मतं दिली आहेत, फडणवीस साहेब षडयंत्र हाणून पाडा. नाहीतर माझा नाईलाज आहे. एकनाथ शिंदे, फडणवीस आणि शंभूराज देसाई यांच्यावर विश्वास टाकला आहे. आम्ही आरक्षण घेणार आहोत. एकही नोंद रद्द होऊ देणार नाही. एक जरी नोंद रद्द केली तर मराठ्यांचा पुढचा लढा मंडल कमिशन रद्द करण्यासाठी असेल. आमच्या मुंडक्यावर पाय देऊन आमच्या हक्काचं असून आम्हाला खायला देणार नसतील तर इथून पुढचं आंदोलन मंडल कमिशनविरोधात असेल,’ असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.
अधिक वाचा –
– ‘ज्यांनी मते दिली त्यांचा आणि नाही दिली त्यांच्यासह सर्वांचा मी लोकप्रतिनिधी.. कसलाही दुजाभाव करणार नाही’ – खासदार श्रीरंग बारणे
– शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ; वाचा योजनेची उद्दिष्ट्ये, वैशिष्ट्ये आणि जोखमीच्या बाबी
– खरीप पिकांच्या किमान हमी भावात (एमएसपी) वाढ ! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय