व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मळवंडी ठुले येथे वनविभागाची मोठी कारवाई ! संरक्षित वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी 4 शिकारी अटकेत, 1 फरार

वनविभाग मावळ यांच्याकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. संरक्षित वन्यप्राण्याची शिकार करून मांस शिजवून खाणाऱ्या चार जणांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 22, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Maval forest department

Photo Courtesy : Team Dainik Maval


वनविभाग मावळ यांच्याकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. संरक्षित वन्यप्राण्याची शिकार करून मांस शिजवून खाणाऱ्या चार जणांना वनविभागाने ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे. बुधवार (दिनांक 19 जून) रोजी मौजे मळवंडी ठुले येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 19) प्राप्त माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ आणि कर्मचारी यांनी मौजे मळवंडी ठुले येथे धाड टाकली. यावेळी तिथे संरक्षित भेकर प्रजातींच्या वन्य प्राण्याचे (शेड्युल 1) शिजवलेले मांस आढळून आले. अधिकाऱ्यांनी 1) दिनेश ज्ञानेश्वर ठुले (रा. मळवंडी ठुले) 2) गंगाराम धोंडीबा आखाडे (रा. मळवंडी ठुले) 3) सुनील ठोकू कोकरे (रा. मळवंडी ठुले) आणि एक अल्पवयीन यांना शिजवलेले मांस आणि एक दुचाकी, मानवी बनावटीच्या 2 बंदुका, 1 कोयता, 1 भाला, 1 काडतूस, छरा, गॅस सिलेंडर, शेगडी या हत्यार चीजवस्तूंसह ताब्यात घेतले.

चारही शिकारी आरोपींविरोधात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 आणि भारतीय हत्यार कायदा 1959 अन्वये वन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपी 1 ते 3 यांना 6 जुलै 2024 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर आरोपी क्र. 4 याला बाल विधी मंडळ येरवडा यांनी समुपदेशनासाठी एका संस्थेकडे पाठवले आहे. तसेच संशयित मुख्य आरोपी सचिन अशोक तोंडे (रा. मळवंडी ठुले) हा फरार असून वन विभागाचे पथक त्याचा शोध घेत आहे.

मुख्य वनसंरक्षक (प्रा.) एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक (प्रा.) महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ हनुमंत जाधव, वनपरिमंडळ अधिकारी दया डोमे, आशा मुंढे, वनरक्षक साईनाथ खटके, वनरक्षक संदिप अरूण, इतर वनरक्षक आणि वनसेवक बबन शिंदे, विशाल सुतार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अधिक वाचा –
– शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ; वाचा योजनेची उद्दिष्ट्ये, वैशिष्ट्ये आणि जोखमीच्या बाबी
– खरीप पिकांच्या किमान हमी भावात (एमएसपी) वाढ ! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
– इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, वाचा अधिक

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

कान्हे येथे मावळमधील विणेकऱ्यांचा सन्मान ; ‘वारकऱ्यांना सन्मानित करण्याची सेवा आमदार सुनिल शेळके दरवर्षी करतात हे कौतुकास्पद’

Next Post

‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही’, सरकारच्या आश्वासनानंतर हाकेंचे उपोषण स्थगित ; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
OBC Leader Laxman Hake Hunger Strike

'ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही', सरकारच्या आश्वासनानंतर हाकेंचे उपोषण स्थगित ; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Conclusion of Shri Swami Samarth Namjap ceremony held to mark Adhik Maas

तळेगाव दाभाडे : अधिक मासानिमित्त १ कोटी २५ लाख श्री स्वामी समर्थ नामजप सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता

June 14, 2026
New District Executive Committee of Bharatiya Janata Party BJP Mahila Morcha Pune North District announced

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, पुणे उत्तर जिल्ह्याची नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर; कार्यकारिणीत मावळचा दबदबा

June 14, 2026
Women farmers to get distinct identity Women Farmers Empowerment Bill to be tabled during monsoon session

महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख; राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सादर होणार ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’

June 14, 2026
Gutkha manufacturers will be subject to MCOCA in new year said Minister Narhari Zirwal informed

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई होणार ; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल

June 14, 2026
Transport vehicles carrying silt from lake should not be obstructed directives from Minister Sanjay Rathod

तलावातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहतुकीची अडवणूक करू नये; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे निर्देश

June 14, 2026
Entry ban for heavy vehicles in Lonavala

महत्वाची बातमी ! पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

June 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.