व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कान्हे येथे मावळमधील विणेकऱ्यांचा सन्मान ; ‘वारकऱ्यांना सन्मानित करण्याची सेवा आमदार सुनिल शेळके दरवर्षी करतात हे कौतुकास्पद’

श्री विठ्ठल परिवार मावळ आणि आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने कान्हे येथे आज (शनिवार, दि. 22) मावळ तालुक्यातील विणेकऱ्यांचा सन्मान समारंभ संपन्न झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 22, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Warkari felicitated maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


श्री विठ्ठल परिवार मावळ आणि आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने कान्हे येथे आज (शनिवार, दि. 22) मावळ तालुक्यातील विणेकऱ्यांचा सन्मान समारंभ संपन्न झाला. या सन्मान सोहळ्याला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे परंपरागत चोपदार हभप राजाभाऊ चोपदार आणि संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

‘वारकरी निरपेक्ष भावनेने वारी करत असतात, त्यांना सन्मानित करणे आपल्या समाजाचे कर्तव्य आहे आणि या समाजाचे लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार सुनिल शेळके ही सेवा करतात. हे नक्कीच कौतुकास्पद आहे,’ असे प्रतिपादन संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे परंपरागत चोपदार हभप राजाभाऊ चोपदार यांनी केले. ( Warkari felicitated on behalf of shri vitthal parivar maval & mla sunil shelke at kanhe )

आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगत असे गुज पांडुरंग ॥
वरील उक्तीप्रमाणे आषाढी वारी आली की वारकऱ्यांना पंढरपुराचे वेध लागतात. लाखोंच्या संख्येने वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत ग्यानबा-तुकारामाच्या नाम घोषात पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वारीची ही परंपरा जपण्याचे काम मावळ तालुक्यातील वारकरी आजही भक्तीभावाने करीत आहेत. मावळातील प्रत्येक गावातून दिंड्या आषाढी वारीत सहभागी होत असतात. या दिंड्यांमधील विणेकऱ्यांचा योग्य सन्मान व्हावा, यासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हा सन्मान सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो.

यावेळी उद्योजक शंकरराव शेळके, सरपंच विजय सातकर, हभप नितीन काकडे, रामदास धनवे, उत्तमराव बोडके, संतोष काळोखे, मुकुंद राऊत, बाळासाहेब आडकर, बाळासाहेब जांभुळकर, दत्ता केदारी, गोपीचंद कचरे, नारायण ठाकर, दिनेश सातकर, निलेश वारिंगे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विठ्ठल परिवारचे अध्यक्ष गणेश जांभळे यांनी तर आभार लक्ष्मण सातकर यांनी मानले.

अधिक वाचा –
– खरीप पिकांच्या किमान हमी भावात (एमएसपी) वाढ ! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
– इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, वाचा अधिक
– हुश्श… ! मान्सून सरी बरसल्याने पवना धरणातील जलसाठा स्थिर होण्यास मदत, शुक्रवारी 55 मी.मी. पाऊस । Pavana Dam Updates


dainik maval jahirat

Previous Post

‘ज्यांनी मते दिली त्यांचा आणि नाही दिली त्यांच्यासह सर्वांचा मी लोकप्रतिनिधी.. कसलाही दुजाभाव करणार नाही’ – खासदार श्रीरंग बारणे

Next Post

मळवंडी ठुले येथे वनविभागाची मोठी कारवाई ! संरक्षित वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी 4 शिकारी अटकेत, 1 फरार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval forest department

मळवंडी ठुले येथे वनविभागाची मोठी कारवाई ! संरक्षित वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी 4 शिकारी अटकेत, 1 फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
Lonavala residents public outcry against Tata highway blocked demanding compensation for flood damages

टाटा कंपनीविरोधात लोणावळाकरांचा जनआक्रोश, महामार्ग रोखला ; पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आंदोलन

July 29, 2026
Laptops distributed to Assistant Agriculture Officers by Deputy Chief Minister Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप

July 29, 2026
Car overturns into field after road collapses at Kale-Pavananagar no remedial measures taken after accident

काले-पवनानगर येथे रस्ता खचल्याने कार शेतात उलटली, सुदैवाने जिवितहानी टळली; अपघाताच्या चार दिवसांनंतरही उपाययोजना शून्य

July 28, 2026
Rice-Cultivated-Maval

Rice Farming in Maval Taluka : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

July 28, 2026
SRT

SRT Rice Technique : ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या

July 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.