व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील 5 हजार वारकरी बंधु-भगिनींना पोशाख देऊन आमदार सुनिल शेळकेंनी व्यक्त केली कृतज्ञता । MLA Sunil Shelke

आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील 5 हजार वारकरी बंधु-भगिनींना पोशाख वाटप

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 25, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
distribution of clothes to 5 thousand Warkari

Photo Courtesy : Team Dainik Maval


पंढरीची पायी वारी करीत वारकरी संप्रदायाची परंपरा अखंड सुरु ठेवणाऱ्या मावळ तालुक्यातील सुमारे 5,000 स्त्री पुरुष वारकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन पोशाख प्रदान करत आमदार सुनिल शेळके यांनी समस्त वारकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. आमदार शेळके यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या श्री विठ्ठल परिवार मावळ,सकळ दिंडी नियोजन समिती यांच्या वतीने गेली काही वर्षे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आमदारांनी प्रत्येक गावात पोशाख पाठवून सन्मान केल्याबद्दल तालुक्यातील वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुका दिंडी समाजाचे अध्यक्ष हभप तुकाराम महाराज गायकवाड म्हणाले की, पायी वारीची परंपरा मावळ तालुक्यातील हजारो वारकऱ्यांनी आजही जपली आहे आणि या वारकऱ्यांची सेवा करण्याचे महान कार्य आमदार सुनिल शेळके विविध माध्यमातून कायमच करत आले आहेत. त्यांच्या या सेवाकार्याला आमच्या नेहमीच सदिच्छा आहेत. ( distribution of clothes to 5 thousand Warkari of Maval taluka through MLA Sunil Shelke )

“मावळ तालुक्याला असा आमदार लाभला आहे ज्यांचे वारकरी संप्रदायासाठी खूप योगदान आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने मावळातील पाच हजार पुरुष महिला वारकऱ्यांना घरपोच पोशाख देऊन त्यांनी सन्मानित केले. खुप समाधान वाटले. सर्व वारकऱ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी नेहमी आहेत,” अशा भावना श्री क्षेत्र घोरावडेश्वर दिंडीचे अध्यक्ष हभप मुकुंद नाना राऊत यांनी व्यक्त केल्या.

श्री विठ्ठल परिवार मावळ, सकळ दिंडी नियोजन समिती यांच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.अखंड हरिनाम सप्ताह, उन्हाळी सुट्टीत बाल वारकरी प्रशिक्षण शिबिर, तालुकास्तरीय भजन स्पर्धा, विणेकरी सन्मान, भव्य कीर्तन महोत्सव अशा उपक्रमांना तालुक्यातील वारकरी संप्रदायाकडून दरवर्षी मोठा प्रतिसाद असतो.

अधिक वाचा –
– येळसे गावात भात लागवडीस सुरूवात, मावळ कृषि विभागाच्या कृषि संजिवनी मोहिमेला यश । Maval News

– ‘आम्ही इथले भाई…’ असे म्हणत तळेगाव शहरात गोळीबार करणाऱ्या गुंडांना नाशिकमधून अटक, 7 गावठी पिस्तूल जप्त । Talegaon Crime
– इंदोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप नाटक यांची बिनविरोध निवड । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

वाढदिवसानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेत शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप । Maval News

Next Post

14 वर्षानंतर पुन्हा भरली शाळा ! पवना विद्या मंदिर शाळेत 2009 वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pavana Vidya Mandir School Pavananagar

14 वर्षानंतर पुन्हा भरली शाळा ! पवना विद्या मंदिर शाळेत 2009 वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.