व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘आम्ही इथले भाई…’ असे म्हणत तळेगाव शहरात गोळीबार करणाऱ्या गुंडांना नाशिकमधून अटक, 7 गावठी पिस्तूल जप्त । Talegaon Crime

तळेगाव दाभाडे परिसरात अंधाधुंद गोळीबार करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळ्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच त्यांच्याकडून एकुण 7 गावठी पिस्तुले व 14 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 25, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Talegaon Dabhade Crime

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव दाभाडे परिसरात अंधाधुंद गोळीबार करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळ्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच त्यांच्याकडून एकुण 7 गावठी पिस्तुले व 14 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. गुरूवारी (दि. 20 जून) रात्री 8 च्या सुमारास अज्ञात टोळक्यांनी तळेगाव शहरातील चार ठिकाणी ‘आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला लागायचं नाही’ असं म्हणत हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी तातडीने याप्रकरणी पथके तयार करून संशयित आरोपींचा शोध घ्यायला सुरूवात केली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पहिली कारवाई – तळेगाव दाभाडे येथे गुरुवारी, दि. 20 जून रोजी रात्री 8.010 ते 8.30 च्या दरम्यान गजानन महाराज चौक ते राजेंद्र चौक दरम्यान पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी रोहन ऊर्फ चिक्या उत्तम शिंदे, विकी खराडे आणि त्यांचे अनोळखी 4 साथीदारांनी मोटार सायकलींवर येवून “आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागायच नाही” असे मोठमोठ्याने बोलून शिवीगाळ करत त्यांच्या हातातील पिस्तुलाने गोळीबार करत लिंबफाट्याचे दिशने निघून गेले होते. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस आनंद तुकाराम मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपींविरोघात भारतीय दंड विधान कलम 308, 143, 144, 147, 148, 149 भारतीय हत्यार कायदा क. 3 (25) (27) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) सह 135 क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अक्ट कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

त्यानंतर गुन्हे शाखेचे युनिट व ब्रॅन्च तसेच तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. आरोपींचा शोध घेत असताना गुंडा विरोधी पथकातील सहा.फौज. प्रविण तापकिर व पोलिस हवालदार चौधरी यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे गुंडा विरोधी पथकातील अधिकारी पोउपनि जगताप व अंमलदार यांनी नाशिक येथे जाऊन आरोपी 1) रोहन ऊर्फ चिक्या उत्तम शिंदे (वय 18 वर्षे, रा. कातवी रोड, तळेगाव दाभाडे) 2) निरज ऊर्फ दाद्या बाबू पवार (वय 19 वर्षे, रा. नेहरुनगर, पिंपरी) 3) आदित्य नितीन भोईनल्लू (वय 21 वर्षे, ता. शिरुर जि. पुणे) यांना ताब्यात घेतले आणि पुढील तपासासाठी तळेगाव दाभाडे पोलीसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर आरोपींना वडगाव न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कस्टडीची रिमांड सुनावली आहे. अटक आरोपींकडुन तपासामध्ये एकुण 3 गावठी पिस्तुले आणि 8 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.

हे आरोपी गुंडा विरोधी पथकाच्या ताब्यात असताना त्यांच्याकडे तपास केला असता मिळालेल्या माहितीनुसार आणखी काही अवैध शस्त्रे परिसरात असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पो.उ.नि. अशोक जगताप व पो.उ.नि. हजरत पठाण यांची दोन पथके तयार करुन तळेगाव दाभाडे परिसरात रवाना करण्यात आली होती.

दुसरी कारवाई – पो.उ.नि. अशोक जगताप यांच्या पथकाने निलया नाईकनवरे सोसायटी (तळेगाव दाभाडे) येथून ओमकार ऊर्फ बंटी दत्ता आसवले (वय 20 वर्षे, रा. मु.पो. टाकवे बु, ता. मावळ) याला ताब्यात घेवून त्याच्याकडून 51 हजार रुपये किमतीचे 1 गावठी पिस्तुल आणि 2 जिवंत काडतुसे हस्तगत करुन त्याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातगुन्हा नोंद करून भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीला प्रथमवर्ग न्यास दंडाधिकारी वडगाव न्यायालयालयात हजर केले असता कोर्टाने 4 दिवसांची पोलीस कस्टडीची रिमांड दिली आहे.

तिसरी कारवाई : पो.उप.निरी. हजरत पठाण यांच्या पथकाने तपोधान कॉलनी गार्डन वराळे रोड तळेगाव येथून संशयितरित्या थांबलेल्या 1) समर्थ संभाजी तोरणे (वय 19 वर्षे, रा. कात्रज, पुणे) 2) अमन मेहबुब शेख (वय 19 वर्षे, रा. कोंढवा, पुणे) याना ताब्यात घेवून त्यांच्या कब्जातून 1 लाख 52 हजार रुपये किमतीची 3 देशी बनावटीचे पिस्तुले आणि 4 जिवंत काडतुसे हस्तगत केली. त्यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींला वडगाव न्यायालयाने 4 दिवसांची पोलिस कस्टडीची रिमांड सुनावली आहे. सदर कारवाईत पोहवा मेदगे, पोना शामबाबा यांनी तांत्रिक विश्लेषणाची विशेष कामगिरी केली.

ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त सुनिल रामानंद, अपर पोलीस आयुक्‍त डॉ. श्री. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्‍त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उप निरीक्षक अशोक जगताप, हजरत पठाण, पोलीस अंमलदार प्रविण तापकिर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, गणेश मेदगे, विजय गंभिरे, सुनिल चौधरी, मयुर दळवी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, शुभम कदम, रामदास मोहीते, ज्ञानेश्वर गिरी, तौसिफ शेख आणि नागेश माळी व पोपट हुलगे यांनी केली आहे.

अधिक वाचा –
– पुणे रिंगरोड बाबत महत्वाची बातमी ! ‘एमएसआरडीसी’कडून प्रकल्पाबाबत महत्वाची अपडेट समोर । Pune Ring Road
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 161 इमारती धोकादायक । Talegaon Dabhade
– वडगावमध्ये पंढरपूरला पायी जाणाऱ्या दिंडीचा सन्मान ; पोटोबा महाराज देवस्थानचा वार्षिक अहवालही प्रकाशित । Vadgaon Maval


Previous Post

इंदोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप नाटक यांची बिनविरोध निवड । Maval News

Next Post

येळसे गावात भात लागवडीस सुरूवात, मावळ कृषि विभागाच्या कृषि संजिवनी मोहिमेला यश । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Rice cultivation started Maval

येळसे गावात भात लागवडीस सुरूवात, मावळ कृषि विभागाच्या कृषि संजिवनी मोहिमेला यश । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval taluka shaken Youth burnt along with bike body found in field along Mahagaon Dhalewadi road

मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला

April 28, 2026
Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
Crime

जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime

April 28, 2026
musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.