पक्की अनुज्ञप्ती अर्थात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याच्यादृष्टीने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ मध्ये वेल्हा, उरळीकांचन, हडपसर, शिक्रापूर, पिरंगुट, शिरुर, जेजुरी, सासवड व भोर येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दैऱ्याच्या दिवशी जर शासकीय सुट्टी जाहिर झाली तर त्या दिवसाचा दौरा आधीच्या किंवा कामाच्या पुढच्या दिवशी घेण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी कळविले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वेल्हा येथे ३ जुलै, २ ऑगस्ट, ४ सप्टेंबर, ४ ऑक्टोबर, ४ नोव्हेंबर आणि ३ डिसेंबर, उरळीकांचन येथे ५, १६ व २९ जुलै, ६, १४ व २६ ऑगस्ट, ५, १२ व २५ सप्टेंबर, ८, १४ व २८ ऑक्टोबर, ५, १२ व २५ नोंव्हेंबर आणि ४, १७ व २६ डिसेंबर, हडपसर येथे १० जुलै, ८ ऑगस्ट, ११ सप्टेंबर, १० ऑक्टोबर, ११ नोव्हेंबर आणि १२ डिसेंबर, शिक्रापूर येथे ९ व २३ जुलै, १२ व २१ ऑगस्ट, १० व २६ सप्टेंबर, १५ व २४ ऑक्टोबर, २० व २८ नोव्हेंबर आणि ५ व २४ डिसेंबर, पिरंगुट येथे १८ जुलै, २२ ऑगस्ट, १८ सप्टेंबर, २२ ऑक्टोबर, १९ नोव्हेंबर आणि १८ डिसेंबर या कालावधीत दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शिरूर येथे ४, १५ व २४ जुलै, ७, १३ व २७ ऑगस्ट, ६, १९ व २४ सप्टेंबर, ९, १७ व २९ ऑक्टोबर, ६, १३ व २७ नोव्हेंबर आणि १०, १९ व ३० डिसेंबर, जेजुरी येथे २६ जुलै, २३ ऑगस्ट, २७ सप्टेंबर, २५ ऑक्टोबर, २२ नोव्हेंबर आणि २७ डिसेंबर, सासवड येथे १२ व १९ जुलै, ९ व १६ ऑगस्ट, १३ व २० सप्टेंबर, ११ व १८ ऑक्टोबर, ८ व १४ नोव्हेंबर आणि १३ व २० डिसेंबर तर भोर येथे ८ व २२ जुलै, ५ व २० ऑगस्ट, ९ व २३ सप्टेंबर, ७ व २१ ऑक्टोबर, ७ व १८ नोव्हेंबर आणि ९ व २३ डिसेंबर या कालावधीत दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अर्ज कसा करावा –
शिकाऊ अनुज्ञप्ती काढून ३० दिवस झाल्यानंतर पक्क्या अनुज्ञप्तीच्या वाहन चालविण्याच्या चाचणी परिक्षेकरिता अर्ज करु शकतो.
आवश्यक कागदपत्रे –
– नमुना ४ (Form ४)
– शिकाऊ अनुज्ञप्ती
– नजीकच्या कालावधीत काढलेले तीन फोटो.
– वयाचा आणि पत्त्याचा केंद्रिय मोटार वाहन नियम ४ नुसार पुरावा.
– परिवहन संवर्गातील वाहनांकरिता अर्ज केल्यास मोटार ट्रेनिंग स्कूलचे नमुना ५ मधील प्रमाण्पत्र.
– शुल्क्
– ज्या वाहनांवर चाचणी द्यावयाची त्या वाहनांची सर्व वैध कागदपत्रे.
चाचणी परिक्षा –
वाहनचालक चाचणी यशस्वीरित्या पार केल्यानंतर चालकास परवाना दिला जाईल. जर चालक वाहनचालक चाचणी पास करू शकला नाही तर तो सात दिवसांच्या कालावधी नंतर पुन्हा प्रयत्न करू शकतो. ( Pimpri Chinchwad RTO Monthly Visit Time Table From July to December 2024 Read in Details )
अधिक वाचा –
– पालखी सोहळा काही तासांवर पण इंद्रायणी अद्याप फेसाळलेलीच, वारकरी भाविकांकडून तीव्र संताप व्यक्त । Indrayani River Pollution
– ‘साहेब, हा भोंगळ कारभार थांबवा..’ मावळ तालुक्यात विजेचा लपंडाव, युवक काँग्रेसचे महावितरणला निवेदन । Maval News
– 18व्या लोकसभेची स्थापना, ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी, राहुल गांधी विरोधी पक्ष नेता, संसदेने पाहिला दुर्मिळ प्रसंग