कान्हे गावातील आदर्श युवक कै. अमित जाचक यांच्या प्रथम जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. 2 जुलै) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथे 50 खुर्च्यांची मदत करण्यात आली. तसेच किनारा वृद्धाश्रम येथे अन्नदान करण्यात आले. विविध सामाजिक संघटनांमध्ये सक्रीय असणारे तसेच सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक अमित जाचक यांचे गतवर्षी अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मंगळवारी, कै. अमित विष्णू जाचक यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे बंधू अमोल जाचक यांसह संदेश सातकर, शशांक सातकर यांनी जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा कान्हे येथे 50 खुर्च्या भेट देऊन शाळेला मोठी मदत केली. याचा विद्यार्थी आणि शिक्षकांना विशेष उपयोग होणार आहे. सकाळी अकरा वाजता शालेय परिपाठादरम्यान खुर्च्या प्रदान करण्यात आल्या. याप्रसंगी कान्हे शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी सुकेशिनी कोले, सर्व शिक्षक, गावातील युवक, अशोक सातकर, महेश सातकर, गणेश सातकर, अविनाश शेडगे आणि मित्र परिवार हजर होते. ( Gift of 50 chairs to Kanhe School on occasion of Amit Jachak first birth anniversary )
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर सातकर यांनी शाळेच्या वतीने सर्वांचे स्वागत केले. आरतीताई भाळवणे यांनी आभार मानले. स्वप्नाली आरोटे, रोहिणी वाघमारे, चवरे ताई, पालक वर्ग यावेळी उपस्थित होता. त्यानंतर मित्रवर्गाने किनारा वृद्धाश्रमातील नागरिकांना अन्नदान करून कै. अमित जाचक यांना श्रद्धांजली वाहिली.
अधिक वाचा –
– पीडीसीसी बँकेकडून मावळ तालुक्यातील 11 शाळांना शैक्षणिक मदत; ‘या’ विद्यालयांना शालेय साहित्यांसाठी धनादेशांचे वाटप
– पोल्ट्री व्यावसायिकांचा एल्गार, ‘या’ मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा, वाचा काय आहेत मागण्या
– मावळ तालुक्यात नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचे लवकर वाटप व्हावे – सकल मराठा समाज