व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्रता निकष जाहीर, वाचा कोण होणार लाभार्थी आणि आवश्यक कागदपत्रे

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ या योजनेचे निकष जाहीर करण्यात आले असून योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलेचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 10, 2024
in महाराष्ट्र, मावळकट्टा
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

Photo Courtesy : Team Dainik Maval


Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ या योजनेचे निकष जाहीर करण्यात आले असून योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलेचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अशी : लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. ( Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana Eligibility Criteria and documents list )

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे : योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज करावा, लाभार्थ्याचे आधार कार्ड असावे, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर त्याऐवजी त्या महिलेचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, १५ वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जन्मदाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.), परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत असणे अनिवार्य आहे.) मात्र, पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट मिळणार आहे. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत अनिवार्य नाही. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि योजनेच्या अटी- शर्तीचे पालन करण्याबाबतचे लाभार्थ्याचे स्वाक्षरीसह हमीपत्र आवश्यक आहे.

योजनेच्या लाभार्थ्यांची अपात्रता : ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत मात्र अडीच लाख रुपये उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा १५०० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेतला असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

अधिक वाचा –
– वडगाव शहरासाठी स्वतंत्र फिडरमधून वीजपुरवठा करण्याची मागणी ; तालुक्याच्या राजधानीतील विजेचा लपंडाव थांबवावा
– भुशी डॅम येथील पर्यटकांवरील बंदी मागे घ्यावी, आमदार सुनिल शेळके यांची विधानसभेत मागणी, वाचा काय म्हणालेत आमदार…
– अभंग प्रतिष्ठान आणि विश्व अग्निहोत्र परिवार यांच्या वतीने 100 गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि वह्यांचे वाटप । Dehu News

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे येथे शिक्षकांसाठी तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा ; पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत मार्गदर्शन

Next Post

लोणावळा शहराचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

लोणावळा शहराचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Entry ban for heavy vehicles in Lonavala

महत्वाची बातमी ! पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

June 13, 2026
Quality roads should be constructed under Mukhyamantri Baliraja Shet Panand Raste Yojana DCM Sunetra Pawar

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणार; शेतकऱ्यांना मिळणार दर्जेदार रस्ते

June 13, 2026
Ashadhi Palkhi Procession 2026 Best facilities should be provided for Warkaris DCMinister Sunetra Pawar

आषाढी पालखी सोहळा २०२६ : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

June 13, 2026
Crime

माळवाडी रोडवर असणारा आरओ वॉटर फिल्टर फोडून 10 हजारांची नाणी लंपास

June 13, 2026
Theft-News

कंपनीच्या स्टोअर रूम मधून हॅमर मशीन चोरी प्रकरणी कामगाराविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
Liquor stock and contraband worth over 1 crore seized on Mumbai-Pune Highway one person arrested

मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे १ कोटीहून अधिकचा मद्यसाठा व मुद्देमाल जप्त, एकाला अटक ; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

June 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.