श्रीक्षेत्र देहू देहू येथील अभंग प्रतिष्ठान आणि विश्व अग्निहोत्र परिवार यांच्या वतीने संत तुकाराम विद्यालय व संत जिजाबाई कन्या विद्यालय देहू येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सन 2024-25 साठी मोफत गणवेश वाटप व वह्या वाटप उपक्रम संपन्न झाला. या उपक्रमातुन 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व वह्या देण्यात आल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अशा उपक्रमातुन प्रतिकुल स्थितीतून संघर्ष करीत शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिकण्यासाठी प्रेरणा मिळते. अशा भावना येथील सर्व शिक्षकांनी व्यक्त केल्या. याशिवाय विद्यार्थ्यांनी देखील आपण केलेल्या या सहकार्यासाठी मनापासून धन्यवाद व्यक्त करीत आम्ही निश्चितपणे भविष्यकाळात उज्वल यश संपादन करून आपल्या शाळेचे नाव उज्वल करू व आम्ही देखील मोठे होऊन आपल्यासारखेच या शाळेमध्ये पुन्हा येऊन इथल्या भावी पिढीसाठी मदत करू अशा कृतज्ञ भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रम प्रसंगी विश्व अग्निहोत्र परिवाराचे कौस्तुभ जोशी, भीमसेन पुरोहित, महेश कुमार गायकवाड, प्रज्ञा राऊत, मकरंद साळुंके, उद्योजक कैलासशेठ येळवंडे, अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष भसे, उपाध्यक्ष वैभव काळोखे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर यादव, देहूगाव तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष देविदास हगवणे, स्वीकृत नगरसेवक सचिन कुंभार, सचिन काळोखे, विजय मोरे, संतोष येळवंडे, सचिन लिंभोरे, वसंत भसे, अजिंक्य साकोरे, महेंद्र झेंडे, चंदन सुतार, वैभव तुळसनकर, विकास कंद आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक पुजारी सर आणि मुख्याध्यापिका पासलकर मॅडम, उपमुख्याध्यापिका कांबळे मॅडम व शाळेच्या सर्व शिक्षकांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. ( Distribution of free uniforms to needy students on behalf of Abhang Pratishthan Dehu & Vishwa Agnihotra Parivar )
अधिक वाचा –
– चिंचवड शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यास प्रारंभ ; खासदार श्रीरंग बारणेंचे महिलांना आवाहन…
– वडगाव मावळ, लोणावळा येथे खासदार बारणे आणि अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ
– तळेगावकरांचे गाऱ्हाणे ऐकले ! बेजबाबदार मुख्याधिकारी एन के पाटील अखेर निलंबित, ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण भोवले । Talegaon Dabhade News