मावळ लोकसभा मतदारसंघात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मावळ तालुक्यातील वडगावमध्ये हा कार्यक्रम झाला. लोणावळा नगरपरिषदेच्या कार्यालयातील तळमजल्यावरही योजनेचा शुभारंभ केला आहे. जास्तीत-जास्त महिलांना लाभ द्यावा, महिलांना मदत करण्याच्या सूचना खासदार बारणे यांनी अधिका-यांना दिल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वडगावमध्ये झालेल्या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, तहसीलदार यावेळी उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. त्यानंतर तत्काळ या योजनेचा राज्यातील महिलांना लाभ देण्यास सुरुवात झाली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहिना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. सुमारे एक कोटी महिलांना याचा लाभ होणार असून या योजनेची अंमलबजाणी सुरु केली आहे. त्यासाठी वर्षाला ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. १ जुलैपासून या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत. या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ( Launch of Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana at Vadgaon Maval Lonavla )
खासदार श्रीरंग बारणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार सर्व घटकासाठी काम करत आहे. महिलांसाठी अतिशय महत्वाची योजना सुरु केली आहे. जेणेकरुन गरीब महिलांना आर्थिक मदत मिळेल. महिला सक्षमीकरणावर राज्य शासनाने भर दिला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना त्याचाच एक भाग आहे. वर्षाला ४६ हजार कोटी रुपये महिलांना दिले जाणार आहेत. मोठा भाऊ म्हणून मुख्यंत्री एकनाथ शिंदे राज्यातील महिलांच्या पाठिशी उभे आहेत. त्यामुळे महिलांमध्ये मोठा आनंद आहे. अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे.
सोमवारी लोणावळा नगरपालिकेच्या आवारात महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबविण्यात आली होती. याच निमित्ताने त्या ठिकाणी भेट दिली आणि समस्त गरजू महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे सांगितले. याप्रसंगी भगिनींसोबत विविध विषयांवर चर्चादेखील केली.
यावेळी… pic.twitter.com/P6KhG7B0iv
— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) July 9, 2024
मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. वडगावमध्ये योजनेला सुरुवात केली. लोणावळा नगरपरिषेच्या मुख्य कार्यालयातील तळमजल्यावरही शुभारंभ झाला आहे. महिलांना सर्व मदत करण्याच्या सूचना अधिका-यांना केल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! पावसाचा जोर वाढला, पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर । Pune News
– तळेगावकरांचे गाऱ्हाणे ऐकले ! बेजबाबदार मुख्याधिकारी एन के पाटील अखेर निलंबित, ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण भोवले । Talegaon Dabhade News
– मोठी बातमी ! वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस