Pune News : प्रादेशिक हवामान केंद्राने पुणे जिल्ह्यात मंगळवार, दिनांक 9 जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील इयत्ता बारावी पर्यंतच्या सर्व शाळांना 9 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्गमीत केले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी राहील. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
नागरिकांनी सावधानता बाळगावी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये. आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ( Big news Heavy rains increased all schools in Pune district declared holiday on Tuesday )
अधिक वाचा –
– तळेगाव येथे दहावीच्या गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांचा सत्कार ; ‘आपल्याला आवडेल त्याच क्षेत्रात करियर करावं’ – भगवानराव साळुंखे
– मावळ तालुक्यात काँग्रेसकडून पदाधिकारी नियुक्तीचा सपाटा, युवक काँग्रेसमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
– भडवली येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी साकारले बाल उद्यान । Maval News