Dainik Maval News : मराठी पत्रकार संघाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी रामदास वाडेकर (मावळ सत्य), कार्याध्यक्षपदी अतुल पवार (सा. अंबर), सचिवपदी गणेश विनोदे (पुढारी) यांची निवड करण्यात आली. तर मावळते तालुका अध्यक्ष सुदेश गिरमे यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी सुदेश गिरमे नियुक्ती करण्यात आली आहे. संघाच्या नूतन तालुका कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी (दि.२) वडगाव मावळ येथे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
मावळ तालुका कार्यकारिणीसाठी इच्छुक पत्रकारांकडून नावे मागविण्यात आली होती. त्यानुसार तालुक्यातून प्राप्त झालेल्या नावांवर नुकत्याच झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या उपस्थितीत एकमताने नूतन कार्यकारिणीला मान्यता देण्यात आली. तसेच नूतन पदाधिकाऱ्यांना पदग्रहण सोहळ्यात नियुक्तीपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला.
नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी जगन्नाथ काळे (पुढारी) व संकेत जगताप (लोकमत), सहसचिवपदी विशाल कुंभार (प्रभात), खजिनदारपदी नितीन तिकोणे (लोकमत) यांची निवड झाली. प्रकल्पप्रमुखपदी विशाल विकारी (मावळ माझा) व गणेश दुडम (चालता बोलता) यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून सचिन शिंदे (हॅलो मावळ), बंडू येवले (महाराष्ट्र टाइम्स), रेश्मा फडतरे (महाराष्ट्र लाईव्ह १), अंकुश दाभाडे (वृत्त छायाचित्रकार), प्रशांत पुराणिक (सा. अंबर), संजय हुलावळे (प्रभात), दक्ष काटकर (सकाळ), सुभाष भोते (पुण्यनगरी) आणि भारत काळे (सकाळ), माऊली वाघमारे ( बारामती लाईव्ह) यांचा समावेश करण्यात आला आहे.
पदसिद्ध कार्यकारिणी सदस्य म्हणून मनोहर दाभाडे – अध्यक्ष, तळेगाव दाभाडे (प्रभात), विलास भेगडे – अध्यक्ष, प्रेस फाऊंडेशन (लोकमत), रमेश कांबळे – अध्यक्ष, देहूरोड (पुढारी), सतीश गाडे – अध्यक्ष, वडगाव मावळ (नवराष्ट्र), चेतन वाघमारे – अध्यक्ष, कामशेत (प्रभात) आणि रवि ठाकर – अध्यक्ष, पवनानगर (प्रभात) यांचा समावेश आहे. सुरेश साखवळकर (सा. अंबर), बबनराव भसे (सकाळ), सोनबा गोपाळे (केसरी), ज्ञानेश्वर वाघमारे (सकाळ), विवेक इनामदार (मावळ ऑनलाइन), सुदेश गिरमे (लोकमत) आणि निखिल कविश्वर (लोणावळा) हे संघाचे सल्लागार आहेत.
यावेळी तालुका सल्लागार ज्ञानेश्वर वाघमारे, तळेगाव दाभाडे प्रेस फाऊंडेशनचे अध्यक्ष विलास भेगडे, लोणावळा शहर अध्यक्ष नितीन तिकोणे, पवन मावळ अध्यक्ष रवि ठाकर, कामशेत अध्यक्ष चेतन वाघमारे यांच्यासह राधाकृष्ण येणारे, तात्यासाहेब धांडे, बाळासाहेब भालेकर, दिलीप कांबळे, ज्ञानेश्वर ठाकर, अनिल घारे, विशाल कुंभार, संदीप गाडेकर, संजय हुलावळे, सुभाष भोते, आकाश कानापुरम, महेश भागीवंत, अंकुश दाभाडे, श्रीकांत चेपे, राहुल सोनवणे, सोपान येवले, मंगेश आखाडे, चंद्रकांत असवले आदी पत्रकार उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद
– उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप
– ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं
