Dainik Maval News : वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे शनिवारी (दि. १ ऑगस्ट) रोजी सकाळी अकरा ते बाराचे दरम्यान, पोलीस स्टेशन हद्दीतील ज्येष्ठ नागरिक, पोलीस पाटील, महिला दक्षता समिती महिला, व्यापारी संघटना पदाधिकारी व इतर नागरिक आणि दुपारी दीड ते अडीचच्या दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील विद्यार्थी यांना सायबर जनजागृती व नशा मुक्ती अभियान या अंतर्गत शिबिर घेण्यात आले. शिबिरामध्ये सायबर सुरक्षा व अमली पदार्थ जनजागृती विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी 70 ते 75 नागरिक व 100 ते 125 विद्यार्थी हजर होते. उपक्रमात नागरिकांना डिजिटल अरेस्ट, UPI/OTP फसवणूक, QR Code, बनावट लिंक, सोशल मीडिया, ई-मेल, WhatsApp, नोकरी, कर्ज व गुंतवणूक फसवणूक याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून आवश्यक खबरदारी घेण्याबाबत सूचित केले.
सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 हेल्पलाईन, National Cyber Crime Reporting Portal तसेच जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थी व नागरिकांना अमली पदार्थ, तंबाखू, गुटखा, दारू व इतर व्यसनांचे आरोग्य, शिक्षण, कुटुंब व समाजावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले.
व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारणे, चुकीच्या संगतीपासून दूर राहणे, संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देणे तसेच समाजामध्ये जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थी व नागरिकांनी जनजागृती उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून सायबर सुरक्षितता व व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच सायबर जनजागृती अनुषंगाने शपथ घेण्यात आली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद
– उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप
– ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

