महान राष्ट्र डेव्हलपमेंट संस्थेचे अध्यक्ष कमलेश राक्षे यांना 2024 सालचा लोकराजा राजर्षी शाहू महाराज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन यांच्या मार्फत दिला जाणारा हा पुरस्कार यंदा मावळ तालुक्यातील कमलेश राक्षे यांना देण्यात आला. त्यांंच्यासोबत मावळमधील प्रसिद्ध वक्ते तथा यशदाचे प्रशिक्षक विवेक गुरव यांनाही हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कोल्हापूर येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
भारताच्या इस्रो या संशोधन केंद्राचे माजी सेवानिवृत्त अभियंता नगीनभाई प्रजापती यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी जेष्ठ साहित्यिक लेखक प्रा किसनराव कुऱ्हाडे, उपप्राचार्य नेस वाडीया पुणे प्रकाश चौधरी, रयत शिक्षण संस्था दक्षिण विभाग अध्यक्ष ए बी शेख, अविष्कार सोशल ॲड एज्युकेशन संस्था भारत चे अध्यक्ष संजय पवार (पत्रकार) हे उपस्थित होते. ( State Level Lokraja Rajarshi Shahu Gaurav Award to Kamlesh Rakshe Maval News )
अधिक वाचा –
– तळेगावकरांचे गाऱ्हाणे ऐकले ! बेजबाबदार मुख्याधिकारी एन के पाटील अखेर निलंबित, ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण भोवले । Talegaon Dabhade News
– मोठी बातमी ! वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– तळेगाव येथे दहावीच्या गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांचा सत्कार ; ‘आपल्याला आवडेल त्याच क्षेत्रात करियर करावं’ – भगवानराव साळुंखे