लोणावळा येथील आयएनएस शिवाजी मधील डी. आर. डी. ओ. मध्ये काम करणाऱ्या ऑनड्युटी पोलिस हवालदाराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. पोलिस हवालदार हरेद्र सिंग (वय 36 वर्षे, रा. डी.आर.डी.ओ., आय. एन. एस. शिवाजी कुरवंडे ता. मावळ जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
याप्रकरणी पोलिस हवालदार भूपेंद्र सिंग (वय 40 वर्षे, रा. डी आर. डी. ओ. आय. एन. एस. शिवाजी कुरवंडे ता. मावळ जि. पुणे) यांनी पोलिसात खबर दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी, दि. 12 जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजण्यापूर्वी सदर घटना घडली. खबर देणारा भूपेंद्र सिंग हा ड्युटीवर असताना त्याला गोळी झाडल्याचा आवाज आला. ( On-duty police constable commits suicide by shooting himself Incident at INS Shivaji Lonavala )
त्यामुळे त्याने डी.आर. डी. ओ. आय. एन. एस. शिवाजी येथे जाऊन पाहिले असता तिथे त्याला त्याच्या सोबत नोकरी करणारे हरेद्र सिंग हे रक्ताचे थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या हनुवटी, डावा डोळा आणी डोक्याला जखम होऊन रक्तस्त्राव होत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने हरेद्र सिंग याना उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापुर्वी हरेद्र सिंग यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास लोणावळा शहर पोलिस मपोसई दिपाली पाटील या करीत आहे.
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी ! इंदोरी कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील नवीन पुलासाठी 8 कोटीचा निधी मंजूर
– अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना – वाचा सविस्तर
– बापरे बाप ! कार्ला फाटा येथे तब्बल 48 किलो गांजा जप्त, तिघांना अटक, 15 लाखांचा मुद्देमाल जप्त । Lonavala Crime News