मावळ तालुक्यातील पर्यटन नगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा शहर परिसरात मागील 24 तासापासून मुसळधार पाऊस बरसत आहे. गेल्या 24 तासात लोणावळ्यात तब्बल 216 मी.मी. इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक पाऊस असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. शनिवार-रविवार असल्याने लोणावळ्यात पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे. परंतु पावसाचा जोर प्रचंड वाढल्याने पर्यटकांनी जिविताची काळजी घेऊन पर्यटन करावे असे आवाहन करण्यात येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
गेल्या 24 तासात लोणावळा शहर आणि परिसरात 216 मी.मी. अर्थात 8.50 इंच इतका पाऊस झाला आहे. हा पाऊस यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पाऊस आहे. यापुर्वी यंदा एकाच दिवसात 136 मी.मी पाऊस झाल्याची नोंद होती. यासह यंदाचा एकूण पाऊस 1485 मी.मी. वर पोहोचला आहे. लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट, खंडाळा आदी ठिकाणी पर्यटकांनी शनिवार-रविवार असल्याने गर्दी केली असून पावसाचा अंदाज पाहून पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घ्यावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ( Record rainfall in Lonavala city area 216 mm of rain in 24 hours )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील एखाद्या गावात 40 प्रवासी असल्यास त्या गावातून पंढरपूरसाठी विशेष बस सोडली जाणार । Maval News
– महत्वाची बातमी ! इंदोरी कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील नवीन पुलासाठी 8 कोटीचा निधी मंजूर
– अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना – वाचा सविस्तर