Lonavala Bhushi Dam Rain Updates : लोणावळा शहर परिसरात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. गेल्या 24 तासांपासून परिसरात मुसळधार पाऊस पडत असून ओढे नाले दुथडी भरून वाहत आहे. आधीच ओव्हरफ्लो झालेले भुशी धरण पाण्याचा प्रवाह वाढल्याने आणखीन ओव्हरफ्लो झाले असून धरणाच्या पायऱ्यांवर पाण्याचा जोरदार प्रवाह वाहत आहे. ही परिस्थिती पर्यटकांसाठी उचित नसून त्यात दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव भुशी धरण बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पाण्याचा आणि पावसाचा जोर ओसरेपर्यंत भुशी धरण पर्यटकांसाठी बंद असणार आहे, सोबत लोणावळा शहर परिसरात आणि डोंगराळ भागात पावसाचा जोर वाढला असल्याने पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी पर्यटन करून नये, सोबत डोंगरालगत धबधब्याखाली उभे राहू नये, अशाही सुचना देण्यात आल्या आहेत. लोणावळ्यात शनिवारी (दि. 13) यंदाच्या हंगामातील विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तासात लोणावळा शहर परिसरात 216 मी.मी. पाऊस झाला आहे. ( Lonavala Bhushi Dam Rainfall Update Bhushi Dam closed for tourists )
अधिक वाचा –
– ऑनड्युटी पोलिस हवालदाराने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या ; लोणावळा शहराजवळील घटना । Lonavala Crime News
– मावळात दमदार पावसाची हजेरी ; पवनमावळ भागात चारसूत्री पद्धतीने भात लागवडीला वेग
– मावळ तालुक्यातील एखाद्या गावात 40 प्रवासी असल्यास त्या गावातून पंढरपूरसाठी विशेष बस सोडली जाणार । Maval News