लोणावळा शहर आणि परिसरात मागील दोन दिवसांपासून तुफान पाऊस बरसत आहे. रविवारी (दि. 14) खंडाळा भागात जोरदार पाऊस झाल्याने मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ठिकठिकाणी पाणी साठले. त्यामुळे वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लोणावळा शहरात गेल्या 24 तासात विक्रमी पाऊस झाला आहे. शहरात शनिवारपासून पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरले आहे. तर रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. लोणावळा शहरात शनिवारी सकाळी 7 ते रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंत 24 तासात 216 मिलीमीटर तर रविवारी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 140 मिलिमीटर असा जवळपास 30 तासात 356 मिलिमीटर पाऊस झाला आहे. ( BREAKING Heavy rain in Lonavala Khandala area Water accumulated on Mumbai-Pune Expressway )
लोणावळा-खंडाळा भाग आणि रायगड जिल्ह्यात शनिवारपासून जोरदार पाऊस पडत असून येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. या मुसळधार पावसाचा फटका आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्गालाही बसला आहे. एक्सप्रेसवेवरील अमृतांजन ब्रीजजवळ सायंकाळी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत होती.
अधिक वाचा –
– शाब्बास पोरी ! सानिया गपचुप हिची पदव्युत्तर शिक्षणासाठी न्यूयॉर्क विद्यापीठामध्ये निवड ; बाळा भेगडे यांच्याकडून सन्मान
– चमकदार कामगिरीबद्दल इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेला अनेक पुरस्कार । Talegaon Dabhade
– मोठी बातमी ! पाण्याचा प्रवाह वाढला, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी भुशी धरण बंद, पर्यटकांचा हिरमोड । Lonavala Bhushi Dam Updates