आज 16 जुलै अर्थात जागतिक साप दिन. (World Snake Day) मावळ तालुक्यातील वन्यजीव रक्षक मावळ संस्था मागील अनेक वर्षांपासून वन्यजीव वाचवत आहेत. त्यामध्ये दर महिन्याला साधारण 20-25 साप लोकवस्तीमधून सुरक्षित पकडुन त्यांना त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडलं जातं. कुठलाही वन्यप्राणी जखमी असल्यास त्यांना वनविभाग मार्फत पुढे उपचारासाठी पाठवतात आणि स्वस्थ झाल्यावर निसर्गामध्ये मुक्त करतात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे आणि सभासद सर्जेश पाटील, निनाद काकडे, जिगर सोलंकी, भास्कर माळी, तुषार सातकर, शत्रुघ्न रासंकर, रमेश कुंभार, केतिका कासेट्वर, रोहित पवार, मोरेश्वर मंदेकर आणि इतर सहकारी गावागावात जाऊन सापांचे प्राण वाचवितात आणि लोकांमध्ये जागृती करतात. ( World Snake Day 37 types of snakes are found in Maval taluka 8 of them are poisonous )
आजवर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी 21 हजारहून अधिक लोकापर्यंत पोहोचून सर्प आणि वन्यप्राण्यांबद्दल जनजागृती केली आली. वनविभाग वडगाव, वनविभाग शिरोता आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था चे संयुक्त विद्यमाने मावळ तालुका भर जनजागृती करण्यात आली आहे. कोणता ही सर्प किंवा वन्य प्राणी मारू नये असे आव्हान संस्थेचे सर्व सदस्य नागरिकांना करत आहे आणि सर्वांना जागतिक सर्प दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहेत.
“आपल्या मावळ तालुक्यात एकूण 37 सर्प आता पर्यंत नोंद झाले आहेत, त्यातले 8 साप विषारी आहे आणि बाकी निमविषारी व बिनविषारी आहेत. 8 विषारी मधले फक्त 4 सर्प लोक वस्ती मध्ये जास्त करून आढळून येतात. ते नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे असे आहेत. आपल्या घराजवळ स्वच्छ्ता ठेवावी आणि रात्री बाहेर फिरताना पायात बूट आणि हातात टॉर्च चा वापर करावा. गेल्या 3 वर्षात आम्ही वनविभाग सोबत शाळेत व गावी जाऊन 12000 लोकांना सर्प विषय जागृती केली आहे आणि पुढे पण करत राहणार. सर्पदंश झाल्यावर वेळ न घालवता जवळ च्या रुग्णालयात जावे, सर्पदंश वर औषध उपलब्ध आहेत.” – जिगर सोलंकी (प्राणी अभ्यासक, वन्यजीव रक्षक मावळ संस्था)
“दरवर्षी 16 जुलैला जागतिक सर्प दिन साजरा केला जातो. सापांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्याकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी या दिवसाचे महत्त्व आहे. भक्षक म्हणून साप, बेडूक, कीटक, उंदीर,आणि इतर उंदीरांना खातात, शिकारी लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. साप हे अनेक औषधांचे स्त्रोत देखील आहेत. सर्पदंशासाठी एकमेव सिद्ध आणि प्रभावी उपचार सापविरोधी विष, हे देखील सापाच्या विषापासून घेतले जाते. सापांच्या बाबतीत असणारे अनेक अंधश्रध्दा दूर करणे याबाबतीत जनजागृती करणे तसेच कुठेही साप आढळून आल्यास तत्काळ जागेवर पोहचण्यास नेहमी तत्पर असणारे मावळ वन्यजीव रक्षक मावळचे संस्थापक निलेश गराडे व जिगर सोळंकी यांचे वनविभागस नेहमीच मोलाचे हातभार लागले आहेत.” – सुशील मंतावर, वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील कीर्तनकार आणि वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’, पंढरपूरमध्ये असणार मुख्यालय
– देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा घडविणारी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठांना मिळणार लाभ
– पर्यावणपूरक गणेशोत्सव सजावटीसाठी प्रसिद्ध असलेल्या वर्तक परिवाराचा अमृतमहोत्सवी संकल्प । Lonavala News