व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘हे महादेवा शक्ती दे, लोहगडला मुक्ती दे’ , किल्ले लोहगडावरील अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी, बजरंग दलाचा अल्टिमेटम । Lohgad Fort

मराठ्यांच्या पराक्रमाच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या लोहगडावर सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 16, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल
unauthorized construction at Lohgad Fort

Photo Courtesy : Team Dainik Maval


Lohgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या लोहगडावर सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामामुळे या गडाचे वैभव व पावित्र्य नष्ट होऊ लागले असून हे अनधिकृत बांधकाम त्वरित काढण्यात यावे, असे निवदेन बजरंग दलाच्या वतीने केंद्रीय पुरात्व विभाग, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, जिल्हाधिकारी, तसेच तहसीलदार मावळ यांच्याकडे देण्यात आले आहे. तसेच सदर अनधिकृत बांधकाम त्वरित काढण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून तसे न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

बजरंग दल मावळ आणि सखल हिंदू बांधवांच्या वतीने लोहगड अतिक्रमणमुक्त व्हावा म्हणून शनिवारी (दि. 13) रोजी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘हे महादेवा शक्ती दे, लोहगडला मुक्ती दे’ अशा घोषणांनी लोहगड पायथा दणाणून गेला होता. लोहगडावर लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या वतीने यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ( Bajrang Dal Maval demand to remove unauthorized construction at Lohgad Fort )

यावेळी बजरंग दलाचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक संतोष भेगडे, सोलापूर विभाग मंत्री संदेश भेगडे, विभाग मंत्री सोमनाथ दाभाडे, प्रश्नांत भेगडे,नवनाथ ठाकर, अंनता अगळमे, योगेश शटे, महेंद्र असवले, बजरंग दलाचे सह संयोजक प्रशांत ठाकर, स्वप्निल भालेकर, प्रतिक गोसावी, विशाल ढोले, विश्वास दळवी, दत्ता ठाकर यांच्या सह मोठ्या प्रमाणात बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किल्ले लोहगड वरील अनधिकृत बांधकामे हटविण्याबाबत मागील अनेक वर्ष बजरंग दल संघटने मार्फत सातत्याने पाठपुरावा केला जात असून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती संघटनेला आजपर्यंत देण्यात आली नाही. सध्या राज्यात विशाळगडावरील अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठीचा मुद्दा तापला आहे, त्याच पार्श्वभूमीवर लोहगडावरील अनधिकृत बांधकाम काढण्याची मागणी तीव्र होत आहे. जर पुढील महिन्याभरात लोहगड अतिक्रमण विरहित पहायला मिळाला नाही तर 11 ऑगस्ट रोजी बजरंग दलाच्या व मावळातील जनतेच्या वतीने तीव्र व बेमुदत आंदोलन करणार आहे, असा इशारा यावेळी बोलताना बजरंग दलाच्या वतीने देण्यात आला आहे.

अधिक वाचा –
– कार्ला-लोणावळा भागात मुसळधार पाऊस ! इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील कीर्तनकार आणि वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’, पंढरपूरमध्ये असणार मुख्यालय
– देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा घडविणारी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठांना मिळणार लाभ

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

जागतिक साप दिन : मावळ तालुक्यात आढळतात 37 प्रकारचे साप, त्यातील 8 साप आहेत विषारी । World Snake Day

Next Post

डॉ. विकेश मुथा यांचा ‘रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स’कडून धन्वंतरी पुरस्काराने गौरव । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Dr Vikesh Mutha Talegaon Dabhade

डॉ. विकेश मुथा यांचा 'रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स'कडून धन्वंतरी पुरस्काराने गौरव । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.