तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील तपासात निष्पन्न झालेल्या गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तळेगाव दाभाडे पोलिसांकडून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आला होता. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
१) योगराज ऊर्फ बिट्या विश्वनाथ मुऱ्हे (टोळी प्रमुख) (वय ३६ वर्षे, रा. सोमाटणे ता.मावळ) २) प्रेम सुरेश सोनवणे (वय २९, रा. वर्षे रा.कोथुर्णे ता.मावळ) ३) अमित मच्छींद्र शेटे (वय ३५, रा. चाकण ता. खेड) ४) लहु अशोक भालेकर (वय ३२, रा. सोमाटणे, ता.मावळ) ५) सुरज ऊर्फ बंट्या दत्तु गायकवाड (वय २९ वर्षे रा. फुरसुंगी, हडपसर पुणे) अशी मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून सदर टोळी प्रमुख आणि त्याच्या साथीदारांवर एकुण १२ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. ( Action under Mcoca Act against Murhe Gang in Somatne Talegaon Dabhade Crime )
टोळी प्रमुख आणि त्याच्या साथीदारांनी प्रत्येक गुन्ह्यात स्वतःची संघटीत टोळी तयार करुन अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने, स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन अथवा हिंसाचाराची धमकी देऊन किंवा धाक दाखवुन टोळी प्रमुख व साथीदारांनी तळेगाव दाभाडे, पिंपरी, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणीसाठी पळवून नेणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, दरोडा घालण्याचा प्रयत्न करणे, तोडफोड करणे, बेकायदेशिर अग्निशस्त्रे व जिवघेणी हत्यारे जवळ बाळगणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केल्याचे दाखल आहे. त्यामुळे त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अतंर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अधिक वाचा –
– पाऊस ओसरला मात्र पाण्याची आवक सुरूच, पवना धरणातील पाणीसाठा 34 टक्क्यांच्या पार । Pavana Dam Updates
– लोणावळ्यातील शंकरबन प्रतिष्ठानकडून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हाथ, लवकरच शिष्यवृत्ती सुरू करणार । Lonavala News
– डॉ. विकेश मुथा यांचा ‘रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स’कडून धन्वंतरी पुरस्काराने गौरव । Talegaon Dabhade