दिवंगत शिवसैनिक कै उमेश भाई शेट्टी आणि कै शंकर मोरे यांच्या पुण्यतिथी निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा लोणावळ्यात आयोजित करण्यात आला होता. सालाबाद प्रमाणे यंदाही हा कार्यक्रम घेण्यात आला. गेली ३५ वर्ष सलग मावळ तालुक्यातील शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला जातो. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कार्यक्रमाच्या सुरूवातीला दिवंगत शिवसैनिकांच्या खंडाळा येथील स्मृती स्थळास पूजन करण्यात आले. ह्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भारतीय वायू सेनेचे विंग कमांडर बी.एस. आनंद, पुणे जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी विंग कमांडर बी एस आनंद यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय ढम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सुनिल इंगुळकर यांनी मानले. ( Meritorious students felicitated on death anniversary of late Umesh Shetty & Shankar More Lonavala )
यावेळी लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल पाडाळे, माजी नगरसेविका सौम्या राहुल शेट्टी, भालचंद्र खराडे, सुरेश टाकवे, लक्ष्मण दाभाडे, शाम बाबू वाल्मिकी, ज्ञानदेव जांभूळकर, शंकर जाधव, दिलीप गायकवाड, गणेश कदम, जितेंद्र राऊत, सदानंद पीलाने, दिनेश वीर, अजय ढंम, सतीश गोणते, सुनिल तळेकर, विजय चवरे, ओमकार खराडे, सचिन वाळके, सीमा दळवी, दक्ष शेट्टी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पाऊस ओसरला मात्र पाण्याची आवक सुरूच, पवना धरणातील पाणीसाठा 34 टक्क्यांच्या पार । Pavana Dam Updates
– लोणावळ्यातील शंकरबन प्रतिष्ठानकडून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हाथ, लवकरच शिष्यवृत्ती सुरू करणार । Lonavala News
– डॉ. विकेश मुथा यांचा ‘रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स’कडून धन्वंतरी पुरस्काराने गौरव । Talegaon Dabhade