आषाढी एकादशी निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथे सालाबादप्रमाणे यंदाही सुंदर असा पालखी सोहळा संपन्न झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी सुकेशिनी कोले, सर्व शिक्षक वृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालखीचे पूजन केले आणि सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी शाळेतील प्रत्येक वर्गातून श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या वेशभूषेत विद्यार्थी तयार होऊन आले होते. तर काही मुलांनी संत तुकाराम, संत नामदेव, ज्ञानेश्वर महारांजाचा वेष केला होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
विद्यार्थ्यांनी हाती टाळ घेत, खांद्यावर पताका घेत विठ्ठल नामाचा जयघोष केला. मुलींनी विविध रंगाच्या साड्या परिधान करत डोक्यावर तुळसीवृंदावन घेतले होते. शाळेच्या प्रांगणात रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ चा जयघोष केला. काहींनी फुगड्या खेळल्या. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर सातकर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. ( Palkhi ceremony on occasion of Ashadhi Ekadashi at Zilla Parishad Primary School Kanhe Maval )
पालखीचे प्रस्थान कान्हे गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिराकडे होऊन मंदिरात सुंदर आवाजात शाळेतील शिक्षिका अनिता गाढवे, संगिता मधे आणि दादासाहेब खरात यांनी विद्यार्थ्यासमवेत भजन गायन केले. शेवटी भेरवनाथ मंदिरात सर्वांनी गणेशाची आणि पांडुरंगाची आरती गाऊन विठूरायाला वंदन केले.
पालखी सोहळ्याचे नियोजन मुख्याध्यापिका सुकेशिनी कोले यांनी केले, पालखीची सजावट आरती भाळवणे, स्वप्नाली आरोटे यांनी केली होती. बबिता वाव्हळ, कांबळे, केदारलिंगे आणि बारवे शिक्षिकांनी पालखी पूजन केले. पालखी मार्गावरील व्यवस्थापन सांगळे, नवले, चाळक, शिंदे आणि काळडोके शिक्षकांनी पाहिले. भैरवनाथ मंदिरातील आरतीचे नियोजन अनिता गाढवे, संगिता मधे आणि जिजाराम काळडोके यांनी केले.
अधिक वाचा –
– महासिर माश्यावर संशोधन करणारे फ्रेंडस ऑफ नेचरचे रोहित नागलगांव यांना पीएचडी प्रदान
– तळेगावची वैष्णवी मखर बनली सीए, बारावीपासूनचे स्वप्न केले साकार । Talegaon Dabhade
– विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, अनधिकृत शाळांवर कारवाई करावी ; सह्याद्री विद्यार्थी अकादमीचे निवदेन । Maval News