Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त (दि. 17 जुलै) वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान वारकऱ्यांचा विठू नामाच्या गजरात आकर्षक रिंगण सोहळा संपन्न झाला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आषाढी एकादशी निमित्त शाळेतील बाल वारकरी प्रज्योत गायकवाड, विघ्नेश डाळिंबकर, सप्तश्री उगले, आराध्या फुके या विद्यार्थ्यांनी वारी व वारकरीचे महत्त्व सांगितले. तसेच सहशिक्षिका प्रतिमा पाठक यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी व देवशयनी एकादशी याचे महत्त्व सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी विष्णूचे अवतार असलेले पांडुरंग व विठ्ठल ही एकाच देवाची रूपे आहेत हे आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सांगितले. संस्थेच्या खजिनदार गौरी काकडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. ( Ringan ceremony at Krishnarao Bhegde School Talegaon Dabhade On occasion of Ashadhi Ekadashi )
कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, अध्यक्ष संदीप काकडे, खजिनदार गौरी काकडे संचालिका मंगलाताई काकडे, सोनल काकडे, सुप्रिया काकडे, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर,पर्यवेक्षिका ज्योती सावंत, कीर्ती कुलकर्णी, अश्विनी भट या उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहशिक्षिका माधुरी गवस यांनी केले.
अधिक वाचा –
– कान्हे येथील जिल्हा परिषद शाळेत ‘ग्यानबा तुकाराम’च्या जयषोघात रंगला पालखी सोहळा
– भात उत्पादन वाढीसाठी कडधे गावात चारसूत्री पद्धतीवरील प्रकल्पाचे आयोजन ; लाभार्थी शेतकऱ्यांना निविष्टा वाटप
– ग्रामीण भागात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; एकट्या मावळ तालुक्यात 13 हजार अर्ज । Pune News