Dainik Maval News : कान्हे, टाकवे बुद्रुक गावांजवळ इंद्रायणी नदीला जलपर्णीचा विळखा (Indrayani River Pollution) पडलेला दिसत आहे. या भागातील उद्योग व्यवसाय मधील रसायनमिश्रीत पाणी, सोबत छुप्या पद्धतीने सोडले जाणारे सांडपाणी यामुळे इंद्रायणीच्या नदीपात्राचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. यावर ना ग्रामपंचायतींचा अंकूश आहे ना संबंधित विभागाचा अंकूश आहे. परंतु वाढत्या प्रदुषणाने नदीपात्रात जलपर्णी वाढत चालली असून काही भागात तर नदीचे पाणी दिसणे देखील मुश्कील बनले आहे. त्यामुळे लवकरात लवकर जलपर्णी काढून नदीचा प्रवाह मोकळा करण्याची आणि इंद्रायणीला मोकळा श्वास घेवू देण्याची मागणी जागरूक नागरिक करत आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आंदर मावळ परिसराला जोडणाऱ्या इंद्रायणी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाच्या कठड्यांना आणि खांबांना ही जलपर्णी मोठ्याप्रमाणात अडकली आहे. आणि अशीच जलपर्णी साचत ती पाठीमागे विस्तारत गेलेली दिसत आहे. ही जलपर्णी काढून येथील प्रवाह मोकळा करणे गरजेचा आहे. जलपर्णी परिसरातील गावांमध्ये दुर्गंधी, डास, मच्छरचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथे नदी स्वच्छतेची आणि जलपर्णी काढण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थ करत आहेत. ( Indrayani River Pollution Jalparni Eichhornia Crassipes In River Maval News )
देवनदी अशी ओळख असणारी इंद्रायणी नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. परंतु प्रशासकीय यंत्रणा, शासनाकडून याबाबत घोषणाबाजी आणि निर्णयांचे कागद दाखविण्यापलिकडे काही होताना दिसत नाही. उगमापासून इंद्रायणी नदी पुढे भामा नदीला घेऊन तुळापूर गावाजवळ भीमा नदीस मिळते. या संपूर्ण प्रवासात इंद्रायणी नदी प्रदूषित झालेली दिसते.
जलपर्णी म्हणजे काय?
जलपर्णी या वनस्पतीला पानवेली किंवा वॉटर हायसिन्थ असेही म्हणतात. त्याचे शास्त्रीय नाव Eichhornia Crassipes आहे. जेव्हा नदी, तलाव यात सांडपाणी किंवा घाण पाणी मिसळते, तेव्हा या वनस्पतीस त्यातून खत-खाद्य मिळते, प्रखर सूर्यप्रकाशात ती प्रचंड वेगाने फोफावते व संपूर्ण नदी, नाले व्यापून टाकते. पाण्यावर वनस्पतीचा जाड थर निर्माण होतो.
अधिक वाचा –
– मावळ पुन्हा हादरलं ! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीची थेट येरवडा कारागृहात रवानगी । Maval Crime
– मावळ तालुक्यातील पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा पंचायत समितीत सत्कार । Maval News
– लहान वारकऱ्यांनी केलेल्या विठू नामाच्या गजरात कृष्णराव भेगडे स्कूलमध्ये आकर्षक रिंगण सोहळा संपन्न । Talegaon Dabhade