Dainik Maval News : क्रीडानगरी अशी ओळख असलेल्या मावळ तालुक्यातील गहुंजे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या विकासकामांचे लोकार्पण याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्याच्या राजकारणातील प्रमुख दोन नेते अर्थात विद्यमान आमदार सुनिल शेळके आणि माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे दोघेही एकाच व्यासपीठावर आले होते. लोकसभा निवडणूकीनंतर विकासकामांच्या लोकार्पणासाठी हे दोन दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर आले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
राज्यातील सत्ता समीकरणांत शिंदे-फडणवीस यांच्या जोडीला वर्षभरापूर्वी अजित पवार यांची एन्ट्री झाली आणि ‘शिंदे – फडणवीस – पवार’ अशी ‘शिवसेना – भाजपा – राष्ट्रवादी’ यांची मिळून महायुती अस्तित्वात आली. मागील दीड दोन वर्षांपासून राज्यात हे तीन चाकी सरकार अस्तित्वात आहे. राज्यात युती झाल्यानंतर त्याचे पडसाद मावळ तालुक्यात देखील पाहायला मिळाले. तालुक्यातील जनतेच्या कल्पनेत नसणारे चित्र तालुक्यात पाहायला मिळाले. महायुती म्हणून कट्टर राजकीय विरोधक असणारे आमदार सुनिल शेळके आणि बाळा भेगडे महायुती म्हणून एकत्र आले. लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने ही जवळीक सर्वांनी पाहिली होती. परंतू निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण तसे शांत झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा विकास कामांच्या लोकार्पणानिमित्ताने हे दोन दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर दिसून आले. महायुतीसाठी हे चांगले संकेत मानले जात आहेत. ( MLA Sunil Shelke and Bala Bhegade on a stage Maval Taluka Politics )
गहुंजे येथे विविध विकासकामांचे लोकार्पण –
वीस लक्ष विशेष निधीतून साकारण्यात आलेल्या क्रीडानगरी गहूंजे येथील मुख्य प्रवेशद्वार, पीएमआरडीए अंतर्गत गहूंजे ते शिरगाव रस्ता काँक्रिटीकरण करणे आणि इतर कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी आमदार सुनिल शेळके यांच्यासह माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, एकविरा देवस्थान अध्यक्ष दिपक हुलावळे, रवींद्र भेगडे, गुलाबराव म्हाळस्कर, दत्ताभाऊ गुंड, यशवंत बोडके, मधुकर बोडके, लक्ष्मण बोडके, गोविंद बोडके, संदीप आंद्रे, नितीन मुऱ्हे, गणेश हगवणे, विशाल मुऱ्हे, सरपंच कुलदीप बोडके, उपसरपंच निलेश बोडके, सदस्य उमेश बोडके, अश्विनी बोडके, निता आगळे, हर्षदा बोडके, पुजा बोडके, संजीवकुमार बोडके, नितीन बोडके तसेच शिरगाव ग्रामपंचायत, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– इंद्रायणी नदीला मोकळा श्वास घेवूद्या… टाकवे गावाजवळ इंद्रायणी नदीला जलपर्णीचा विळखा । Indrayani River Pollution
– लोणावळ्यात पावसाचा कहर, 24 तासात तब्बल 148 मी.मी. पाऊस, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन । Lonavala Rain Updates
– बहिणींनंतर आता लाडक्या भावांसाठी योजना, महिन्याला 10 हजार मिळणार, काय आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना? वाचा सविस्तर