Dainik Maval News : कासारसाई-कुसगाव धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ग्रुपमधील एका मुलाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. या बाबत अधिकची माहिती अशी की, शिरगांव-परंदवडी पोलिस ठाण्याचे अधिकारी समाधान फडतडे यांचा वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला फोन आला की, कुजगाव कासारसाई येथील धरणात एक मुलगा बुडाला आहे. ही माहिती मिळताच वन्यजीव रक्षकचे सदस्य तत्काळ घटनास्थळी पोहोचले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
खुप शोधाधोध केल्यानंतर मुलाचा मृतदेह हाती लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथील हा मुलगा आपल्या कॉलेजच्या मित्रांसमवेत कुजगाव – कासारसाई धरण भागात फिरायला आले होते. एकूण पाच जण होते. हे सर्व धरणाच्या पाण्यात जलविहारासाठी उतरले. त्यातील रामचंद्र डोळसे (वय 17. रा. थेरगाव) हा मुलगा पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने बुडाला. याप्रकरणी शिरगाव पोलिसांत नोंद करण्यात आली असून पुढील तपास शिरगाव पोलिस करत आहेत.
वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोनावळा, निलेश गराडे, कुनाल दाभाडे, अविष्कार भिडे, सुशांत नगीणे, विकास दोड्डी, पोलीस पाटील कुजगाव, पोलीस परंदवडी आणि ग्रामस्थ यांनी शोधकार्यात सहभाग घेतला. ( 17-year-old college youth drowned in Kasarasai-Kusgaon dam )
अधिक वाचा –
– ‘वडगावच्या विकासासाठी आतापर्यंत 65 कोटींचा निधी दिला, यापुढेही उर्वरित कामांसाठी निधी देणार’ – आमदार सुनिल शेळके
– अनियमित वीजपुरवठ्यामुळे आंदर मावळातील नागरिकांचे हाल, आमदार शेळकेंनी घेतला आढावा, अधिकाऱ्यांना केल्या सुचना
– इंद्रायणी नदीला मोकळा श्वास घेवूद्या… टाकवे गावाजवळ इंद्रायणी नदीला जलपर्णीचा विळखा । Indrayani River Pollution