Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी (दि. 19 जुलै) पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. मुंबई लेनवर किलोमीटर 35.800 जवळ हा अपघात झाला. कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या पिकअप टेम्पोने एका ट्रकला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, पिकअप टेम्पोच्या समोरील भागाला आग लागली आणि या आगीत चालक जळून खाक होऊन जागीत मृत पावला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मिळालेल्या माहितीनुसार, अथक प्रयत्नांनंतर मृत चालकाचे शव बाहेर काढण्यात यश आले. कोंबडी वाहतूक करणारा हा टेम्पो साखरेची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडकल्याने अपघात झाला. अपघाताची तीव्रता एवढी होती की क्षणातच टेम्पो गाडीने पेट घेतला, त्यामुळे मदत कार्य करताना खूप अडचणी येत होत्या. दोन्ही गाड्यांचे जळून नुकसान झाले असून चालक जागेवरच जळाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातात आणखीन एक जण जखमी झाला असून त्याला बाहेर काढून उपचारार्थ एमजीएम हॉस्पिटल पनवेल येथे रवाना केले आहे. ( Accident on Mumbai Pune Expressway tempo transporting chickens collided driver killed )
देवदूत यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, खोपोली नगर पालिका फायर ब्रिगेड, लोकमान्य हॉस्पिटलची ॲम्बुलन्स व्यवस्था यांनी महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा – बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मदत कार्य पूर्ण केले. हा अपघात शेवटच्या लेनवर झालेला होता, त्यामुळे वाहतुकीला कोणतीच अडचण आली नव्हती. बाधीत वाहने बाजूला काढून महामार्ग संपूर्णता वाहतुकीसाठी खुला आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी : कासारसाई-कुसगाव धरणात बुडून 17 वर्षीय कॉलेज कुमारचा मृत्यू । Pune News
– पिंपरीत शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी ‘भव्य विजयी संकल्प मेळावा’, अजित पवारांच्या पक्षाला खिंडार पाडल्यानंतर पहिलीच सभा
– मावळचे आजी-माजी आमदार पुन्हा एकत्र, लोकसभा निवडणूकीनंतर सुनिल शेळके आणि बाळा भेगडे ‘या’ कारणासाठी एका मंचावर