महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड यांच्या मार्फत 21 वे गिरिमित्र संमेलन 2024 मुंबई येथे पार पडले. दिनांक13 जुलै ते 14 जुलै असे दोन दिवसीय संमेलन संपन्न झाले. यावेळी शिवदुर्ग मित्र संस्थेचे सचिव सुनिल गायकवाड यांना ‘गिरिमित्र गिर्यारोहण – संस्थात्मक कार्य सन्मान’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
या संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून जागतिक किर्तीचे पोलंडचे जेष्ठ गिर्यारोहक क्रिझताफ (क्रिस्ती) विलिन्की ( Krzysztof Wielicki ) आणि इतिहास संशोधक अभ्यासक प्रविण भोसले हे होते. त्यांच्या हस्ते सुनिल गायकवाड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ( Shivadurg Mitra Lonavala Sunil Gaikwad honor in Girimitra Samelan )
महाराष्ट्रातील शोध आणि बचाव मोहिमा यांचीही आकडेवारी आणि प्रत्येक संस्थेचे कार्य यामध्ये शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्कु टीमचे कौतूक यावेळी करण्यात आले. पुरस्कार आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यशवंती हायकर्स खोपोलीचे संस्थापक जेष्ठ गिर्यारोहक पद्माकर गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार योगेश उंबरे, सुनिल गायकवाड, रतन सिंग, सिद्धार्थ आढाव यांनी स्विकारला.
अधिक वाचा –
– कामशेत येथील शिबिरात 71 जणांकडून रक्तदान, शंभराहून अधिक नागरिकांची रक्त तपासणी । Maval News
– तुंग किल्ल्यावर घसरून पडल्याने महिलेचा अपघात, सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांकडून तत्काळ मदत । Maval News
– पवनानगर येथील संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये मातृपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी । Pavananagar News