व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवनानगर येथील संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये मातृपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी । Pavananagar News

संकल्प शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संकल्प इंग्लिश स्कूल पवना नगर येथे गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून आद्य गुरू म्हणुन मातृपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 22, 2024
in लोकल, ग्रामीण
Sankalp English School Pavananagar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : संकल्प शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संकल्प इंग्लिश स्कूल पवना नगर येथे गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून आद्य गुरू म्हणुन मातृपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व माता पालकांच्या हस्ते माता सरस्वती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पूजास्थान पाट,रांगोळी आणि गुलाब पाकळ्यांनी सजविण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपआपल्या मातांचे औक्षण करून पाय धुतले आणि पुष्पगुच्छ देऊन नमस्कार केला. यावेळी शाळेतील वातावरण पूर्ण भक्तिमय झालेले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आई आणि गुरू यावर आधारित गीतांमुळे वातावरण प्रसन्न झाले होते. गुरू आणि माता यांच्यावर आधारित अनेक भित्तीपत्रके विद्यार्थी आणि शिक्षकां मार्फत तयार करण्यात आली होती. यावेळी गुरू पोर्णिमेची पार्श्वभूमी विज्ञान विभाग प्रमुख कल्याणी सावंत, गुरू शिष्य परंपरा क्रीडा विभाग प्रमुख प्रियांका येवले यांनी तर गुरूमहिमा पर्यवेक्षक कैलास येवले यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. माता सर्व वातावरण पाहून भारावून गेल्या होत्या. मनोगत व्यक्त करताना त्यांना आनंदाश्रू रोखता आले नाहीत. ( Sankalp English School celebrated Guru Poornima by performing Matru Pooja Pavananagar )

कार्यक्रमासाठी काले पवनानगर. पोलिस पाटील सीमा यादव,माता पालक प्रतिनिधी अनिता मोहोळ,आरती घारे, वैशाली सोनवणे,आशा सोनवणे ,जयश्री ठाकर, मधु दळवी, प्रतीक्षा करवंदे, आदी माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नीता कालेकर, सोनल गांधी, बाळू कदम, कैलास येवले, प्रियांका येवले, आशा बोरकर, मोना गांधी, वैष्णवी काळे, कल्याणी सावंत आदींनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी समीक्षा लगड ,काव्या ढोरे, समरीन सय्यद, निर्मला अहीर यांनी केले तर आभार समृद्धी भानूसघरे या विद्यार्थिनीने मानले.

आजच्या धावपळीच्या युगात आणि मोबाईल च्या नादात संस्कारांची कमतरता पाहायला मिळत आहे. पण शाळेच्या माध्यामातून असे उपक्रम राबवून निश्चितच संस्कृती आणि संस्कार जपले जात आहेत. – आरती संतोष घारे, पालक

शाळेने राबविलेला उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे समाजात वेगवेगळे गुरू भेटत असताना आपले आई वडील आणि आपले आचार्य यांचे आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. विद्यार्थ्यांकडून हे संस्कारी कृत्य होत असताना खूप आनंद झाला. – सीमा यादव, पालक ( पोलीस पाटील, काले-पवना नगर)

आज संकल्प इंग्लिश स्कूल मध्ये गुरू पौर्णिमेनिमित्त मातृपूजन घेण्यात आले खूप आनंद वाटला. आमच्या मुलांवर चांगले संस्कार या मार्फत होत आहे याचा आम्हाला आनंद वाटतो. – वैशाली भाऊ सोनवणे ,पालक

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात ७० टक्के भात लागवडी पूर्ण, पवन मावळ विभागात सर्वाधिक लावणी
– येळसे गावात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ‘पीक विमा पाठशाळा’ संपन्न, विमा कंपनी आणि कृषी विभागाकडून मार्गदर्शन
– मोठी बातमी : कासारसाई-कुसगाव धरणात बुडून 17 वर्षीय कॉलेज कुमारचा मृत्यू । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

तळेगावच्या मेधा सोनावणे यांना इंग्लंडमधील यूनिवर्सिटी ऑफ रीडिंग मधून ‘पीएचडी’

Next Post

तुंग किल्ल्यावर घसरून पडल्याने महिलेचा अपघात, सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांकडून तत्काळ मदत । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Tung fort Maval Taluka

तुंग किल्ल्यावर घसरून पडल्याने महिलेचा अपघात, सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांकडून तत्काळ मदत । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.