Dainik Maval : मावळ तालुक्यातील नाणे मावळ भागातील वडीवळे धरण शंभर टक्के भरले असून धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वडीवळे धरणाच्या सांडव्यावरून कुंडलिका नदी पात्रामध्ये 10 हजार क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे. ( 10000 cusecs of water is being released from Vadivale dam into Kundlika river Maval )
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सहाय्यक अभियंता खडकवासला कालवा उपविभाग क्रमांक 2 यांनी दिली आहे. तसेच नागरिकांनी काळजी घेण्याचे आणि नदी पात्राजवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )