व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश, सोमवार 29 जुलैपर्यंत बंदी, वाचा आदेश

मावळ आणि मुळशी तालुक्यात सध्या अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे मावळ व मुळशी तालुक्‍यातील सर्व धरणाची पाण्याच्या पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 25, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Bhushi Dam

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ आणि मुळशी तालुक्यात सध्या अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे मावळ व मुळशी तालुक्‍यातील सर्व धरणाची पाण्याच्या पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ झालेली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येत आहेत. तसेच नद्या, ओढे यांच्या प्रवाहात मोठया प्रमाणात वाढ झाल्याने धबधव्यातील पाणी प्रचंड वेगाने वाहत आहे. मावळ व मुळशी तालूक्यातील अतिवृष्टीमुळे सर्व पर्यटन स्थळे, धरणे व त्यासभोतालील परिसर, नदीपात्र धोकादायक स्थितीत आलेले आहेत. त्यामुळे जिवीत व वित्तहानी होण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

काय आहेत आदेश?
मावळ व मुळशी तालुक्यातील सर्व गावांच्या पर्यटन ठिकाणामधील धोकादायक ठिकाणे प्रतिबंधित करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी (जबाबदारी युक्‍त पर्यटन) राबविणे आवश्यक असल्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे सुरेंद्र नवले (उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी) यांनी पुणे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी.,

दिनांक 25 जुलै 2024 सकाळी 8 वाजल्यापासून ते दिनांक 29 जुलै 2024 सकाळी 8 वाजेपर्यंत खालील ठिकाणी जाण्यासाठी ठिकाणनिहाय पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत करीत आहे. या सदर आदेशाची पोलिस विभाग, वन विभाग, ग्रामपंचायत इत्यादींनी संयुक्तरित्या अंमलबजावणी करावी आणि पोलीस विभागाने उपरोक्त ठिकाणी कायमस्वरुपी किंवा फिरता बंदोबस्त तैनात करावा. वन विभागाने त्यांचे अख्त्यारीतील सर्व पर्यटन स्थळे याठिकाणी कायमस्वरुपी गार्डची नियुक्‍ती करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारे व्यक्ती, पर्यचक हे भारती न्याय संहिता 2023 चे कलम 223 मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहणार आहे. ( Prohibitory order at tourist spots in Maval taluka ban till Monday 29th July )

अधिक वाचा –
– लोणावळ्यात देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, पदाधिकाऱ्यांनी देखील केले रक्तदान । Lonavala News
– पवनमावळ भागातील 186 विद्यार्थ्यांना मिळाला डिजिटल गुरु, रोटरी क्लब मावळकडून स्टडी ॲपचे मोफत वाटप । Maval News
– हुल्लडबाजी करणे, बंदी असलेल्या ठिकाणी जाणे भोवले ; लोणावळ्यात 48 पर्यटकांवर कारवाई । Lonavala News


Previous Post

मोठी बातमी ! वडीवळे धरणातून कुंडलिका नदीत 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, नागरिकांनी काळजी घ्यावी

Next Post

मोठी बातमी ! ताम्हिणी घाटात दरड कोसळली, घाट रस्ता बंद, दरड हटविण्याचे काम सुरू । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
crack fell in tamhini ghat

मोठी बातमी ! ताम्हिणी घाटात दरड कोसळली, घाट रस्ता बंद, दरड हटविण्याचे काम सुरू । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval taluka shaken Youth burnt along with bike body found in field along Mahagaon Dhalewadi road

मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला

April 28, 2026
Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
Crime

जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime

April 28, 2026
musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.