Dainik Maval News : पवन मावळ सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हाती देखील आता डिजिटल गुरु आला आहे. येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय शिवली आणि पवना विद्या मंदिर या दोन्ही शाळांमधील इयत्ता दहावीच्या एकूण 186 विद्यार्थ्यांना एसएससी बोर्ड परीक्षेसाठी बहुपयोगी असणारे स्टडी ॲप रोटरी क्लब ऑफ मावळ यांच्याकडून मोफत देण्यात आले. तसेच रोटरीच्या माध्यमातून आठवड्याभरात एकूण 450 विद्यार्थ्यांना या ॲपचे वाटप केले जाईल असे क्लबच्या उपाध्यक्षा रेश्मा फडतरे यांनी सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी मावळ तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती निकिता घोटकुले, पवना फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर, शिवली शालेय समिती अध्यक्ष रघुनाथ लोहार, पवना संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, भाजपा सहकार आघाडी अध्यक्ष ज्ञानेश्र्वर आडकर, रोटरी क्लब ऑफ मावळचे अध्यक्ष नितीन घोटकुले, उपाध्यक्ष रेश्मा फडतरे, सेक्रेटरी पूनम देसाई,माजी अध्यक्ष सुनिल पवार, माजी सरपंच नितिन लायगुडे, जयवंत घारे, रत्नावली इंगळे,अमोल कामत,राजेंद्र दळवी, स्नेहल घोटकुले,संजय घारे,दिपक आडकर,आदी उपस्थित होते. ( Distribution of study app to class 10th students on behalf of Rotary Club of Maval )
वर्षाच्या सुरुवातीला दहावीच्या विद्यार्थ्यांना स्टडी ॲप म्हणजेच डिजिटल गरु तुम्हाला मिळाला आहे. या ॲपच्या माध्यमातून व्हिडिओ, प्रश्नसंच, कृती पत्रिका व बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी अभ्यासक्रम अशा अनेक उपयोगी माहिती माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा वापर करावा, , असे अध्यक्ष नितिन घोटकुले म्हणाले. यावेळी बोलताना कामत म्हणाले की, या डिजीटल ॲपमुळे विद्यार्थ्यांना हसत खेळत शिकता येणार आहे. तसेच यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत होणार आहे.
अधिक वाचा –
– ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर तळेगाव शहर भाजपा अध्यक्षांचा राजीनामा, कार्यकर्त्यांना धक्का । Talegaon Dabhade
– शिळींब सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी भगवान दरेकर ; चेअरमन, व्हाइस चेअरमन पदाधिकाऱ्यांची देखील बिनविरोध निवड । Maval News
– पवना धरण 50 टक्के भरले ! मावळवासियांसह पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी । Pavana Dam Rain Updates